सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या अफेयरच्या बातमीवरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या प्रेमप्रकरणामुळे वारंवार चर्चेत असते. नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी शेअर केली आहे. ज्यात त्यांनी सांगितलंय की, ते आणि सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोघेजण मालदीवमध्ये फिरायला गेले होते. गुरूवारी याबाबत खुलासा करत ललित मोदी यांनी ट्विट करून माझ्या आयुष्याची नवी सुरुवात असं म्हणत सुश्मिता सेन हिच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते.

मात्र, सोशल मीडियावर या दोघांनी लग्न केल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, ललित मोदी यांनी पुन्हा ट्विट करत आम्ही लग्न केलं नसून एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला.

दरम्यान आता सोशल मीडियावर सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या रिलेशन अफेयरवरून अनेक गमतीदार मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत.त्यापैंकी एकाने एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात, “भाई पैसा हो तो क्या कुछ नही हो सकता” तर दुसरा एकाने शेअर केलंय की, “स्टाईल मारते मारते यहाँ तक कर्जेमें डूब चुका हूँ” असे अनेक मजेशीर मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

 

कोण आहे ललित मोदी?

ललित मोदी हे आयपीएलचे पहिले अध्यक्ष होते. जवळपास तीन वर्षे ते आयपीच्या अध्यक्षपदी होते. तसेच, चॅपिअन्स लीग टी२० च्या अध्यक्षपदीही ते होते. शिवाय, बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा कारभारही त्यांनी पाच वर्षे सांभाळला आहे. तर, राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही ते होते.


हेही वाचा :मी स्वत: खूप आश्चर्यचकित झालो…सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या नात्यावर राजीव सेनची प्रतिक्रिया