घरICC WC 20232011 मध्ये 'त्या' वक्तव्याने चर्चेत आलेली पूनम पांडे; आता रेखाने केला तस्साच...

2011 मध्ये ‘त्या’ वक्तव्याने चर्चेत आलेली पूनम पांडे; आता रेखाने केला तस्साच दावा

Subscribe

world cup 2023 : सध्या देशभरात वर्ल्ड कप 2023 ची क्रेझ पाहायला मिळत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येकजण खुपच उत्सुक आहे. आज (ता.19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडीया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे. अनेक जण टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. या सगळ्यात बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही क्रिकेटची क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र या सामन्या दरम्यान चर्चा होत आहे ती पूनम पांडेनी केलेल्या वक्तव्याची.

बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडेने 2011 मध्ये एक व्यक्तव्य केलं होता की, जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ती न्यूड फोटोशूट करेल. 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला असला तरी पूनम पांडे ने तसे केले नाही. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला असला तरी पूनमने तसे केले नाही. स्वस्त लोकप्रियता मिळविण्यासाठी त्याच्यावर अशी विधाने केल्याचा आरोप चाहत्यांनी केला.

- Advertisement -

तेलुगू अभिनेत्री रेखा बोजने आज (ता.19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यापूर्वी एक धाडसी विधान केले आहे. रेखा बोजने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयावर स्पष्ट विधान केलं आहे. रेखा बोजने म्हणाली, की “भारताने विश्वचषक जिंकल्यास ती विशाखापट्टणमच्या वीझाग बीचवर कपड्यांशिवाय धावेल.” रेखा बोजने केलेल्या पोस्टनंतर तिची सगळीकडे चर्चा होत आहे.

रेखा बोज तेलगू चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचा जन्म 30 सप्टेंबर 1998 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. अभिनेत्री तिथे राहते, पण. अभिनेत्रीचे खरे नाव श्री सुषमा आहे. यासोबतच त्याने 2016 मध्ये ‘कालाय तस्मै नमः’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ही अभिनेत्री रंगीला आणि दामिनी विला या चित्रपटात दिसली आहे. रेखा बोज यांची फिल्मी कारकीर्द सध्या फार मोठी नाही.

- Advertisement -

रेखा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय ती ग्लॅमरस स्टाईलमध्ये व्हिडिओही शेअर करत असते. या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर 379 हजार फॉलोअर्स आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -