घरताज्या घडामोडी'या' ५७ वर्षांच्या अभिनेत्यानं ३१ वर्ष लहान मुलीशी केलं पाचव्यांदा लग्न!

‘या’ ५७ वर्षांच्या अभिनेत्यानं ३१ वर्ष लहान मुलीशी केलं पाचव्यांदा लग्न!

Subscribe

एका ५७ वर्षांच्या अभिनेत्याने २६ वर्षीय मुलीशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. हॉलिवूड चित्रपट ‘घोस्ट रायडर’चा अभिनेता निकोलस केज पाचव्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. २६ वर्षीय जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत लास वेगासच्या Wynn हॉटेलमध्ये निकोलस यानं लग्न केलं. निकोलस यानं लग्न साध्या पद्धतीन केलं. पीपल (PEOPLE) मासिकासोबत बातचित करताना निकोलस केज यानं आपल्या लग्नाबाबतच्या बातमीला दुजोरा दिला.

निकोलस केज म्हणाला की, ‘लग्न केल्याची बातमी खरी आहे. आम्ही खूप खुश आहोत.’ निकोलस आणि रीका लग्नाबाबत शुक्रवारी खुलासा केला होता. १६ फेब्रुवारी रोजी निकोलस आणि रीको यांचं लग्न झालं होत. हा दिवस निकोलससाठी खूप विशेष होता.

- Advertisement -

निकोलसच्या टीमनं पीपल मासिकला सांगितलं की, ‘या लग्नाची तारिख निकोलसच्या स्वर्गीय वडिलांचा सन्मान करण्यासाठी निवडली गेली होती.’ लग्नातील पेहरावाबद्दल बोलायचं झालं तर रीको शिबाटानं लग्नात हँडमेट जपानी ब्रायडल किमोनो घातला होता. हा तीन लेअरचा किमोनो होता, क्योटो लेबलचा होता. तर निकोलस केजनं टॉम फोर्डचा बनवलेल्या टक्सीडो आपल्या स्पेशल दिवसांसाठी निवडला होता.

रीकोनं किरोरोचं गाणं विंटर साँगवर एंट्री घेतली होती. निकोलस आणि रीकोचं लग्न ट्रेडिशनल कॅथलिक आणि शिंटोच्या रिती-रिवाजाप्रमाणे झाले. निकोलस आणि रीकोच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. लग्नानंतर एक छोटसं सेलिब्रेशन पार्टी ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये निकोलस आपल्या एक्स पत्नीसोबत सामील झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – स्वप्नील जोशीचा ‘बळी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -