आयुष्याच्या या मजेशीर प्रवासामध्ये तू माझ्यासोबत…पोस्ट शेअर करत निक जोनसने दिलं प्रियांकाला खास सरप्राइज

निक जोनसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रियांकाच्या वाढदिवसाचे चार फोटो शेअर केले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा १८ जुलै रोजी म्हणजे काल वाढदिवस पार पडला. यावेळी प्रियांकाच्या अनेक चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या. काल दिवसभर सोशल मीडियावर प्रियांकाचे अनेक फोटो व्हायरल होत होते. या सगळ्या दरम्यान, प्रियांकाचा पति निक जोनस याने सुद्धा प्रियांकाचा वाढदिवस मोठ्या कौतुकात साजरा केला. नुकतेच काही फोटो निक जोनसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट
वर शेअर केले आहेत. जे आता प्रचंड व्हायरल होत आहेत.

निक जोनसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रियांकाच्या वाढदिवसाचे चार फोटो शेअर केले आहेत.या पहिल्या फोटोमध्ये प्रियांका आणि निक समुद्र्च्या किनाऱ्यावर उभे राहून एकमेकांना किस करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका कुठल्यातरी रेस्टॉरेंटमध्ये बसलेली आहे आणि तिच्या हातामध्ये हॅप्पी बर्थडे प्रियांका 80’s बेबी असा एक टॅग आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये निकने हातामध्ये एका टॅवेलसारखा कपडा पकडलेला आहे, त्या कपड्यावर प्रियांका द ज्वेल ऑफ जुलै असं लिहिलेलं आहे. तर चौथा फोटो रात्रीचा असून दोघेही यामध्ये आकाशातली आतिशबाजी पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

हे फोटो शेअर करत निक डोनसने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझ्या जुलै मधील ज्वेलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्याच्या या मजेशीर प्रवासामध्ये तु माझ्या सोबत असल्याचा मला खूप आनंद होत आहे.आय लव यू” निकच्या या कॅप्शनवर प्रियांकाने सुद्धा सुंदर उत्तर दिलं आहे. त्यात तिने लिहिलंय की, “लव ऑफ माय लाइफ. निक जोनसची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.”

दरम्यान, येत्या काळात प्रियांका, कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती हॉलीवूडच्या ‘सिटाडेल’ आणि ‘एंडिंग थिंग्स’मध्ये सुद्धा दिसणार आहे.


हेही वाचा :निक जोनसपूर्वी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं प्रियांका चोप्राचं नाव