Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी निकने प्रियांकाला दिली बाईकच्या किंमतीची दारू गिफ्ट

निकने प्रियांकाला दिली बाईकच्या किंमतीची दारू गिफ्ट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील देसी गर्ल प्रियांका चोप्राला यावर्षी वाढदिवसानिमित्ताने काही खास गिफ्ट्स मिळाले आहेत. परंतु तिचा पती निक जोनसने जे गिफ्ट दिलं आहे, त्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काल, १८ जुलैला प्रियांका चोप्राचा ३९वा वाढदिवस होता. यानिमित्ताने निक जोनसने प्रियांकाला रेड वाईनची एक महागडी बॉटल गिफ्ट म्हणून दिली आहे.

निक, जो अमेरिकेचा आहे, त्याने प्रियांकाला १९८२ सालच एक चेटो माउटंन रोथ्सचाईल्ड पाठवले आहे. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोअरीवर या दारूच्या बॉटलचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एक मोठा दारूचा ग्लास दिसत आहे. तसेच पांढरी फुलं, मेणबत्ती आणि छोटं-छोटे खेळण्यातल्या बॉटलने टेबल सजवला आहे. फोटो शेअर करत प्रियांकाने ‘love you @nickjonas’ असे लिहिले आहे.

- Advertisement -

प्रियांका दिलेल्या बॉटलची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. एका बॉटलच्या किंमतीत भारतात एक चांगली बाईक खरेदी करू शकतो, अशी जबरदस्त या दारूच्या बॉटलची किंमत आहे. ड्रिंकएंडको डॉट कॉमनुसार ही रेड वाईक १९८२ ती चेटो माउटन रोथ्सचाइल्ड एक दुर्मिळ दारू आहे. या ७५० मिलीलीटरच्या बॉटलची किंमत जवळपास १ लाख ३१ हजार ३७५ रुपये इतकी आहे. दरम्यान प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्ताने पती निक जोनसने आपल्या इन्स्टाग्रामवर पत्नीची एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये प्रियांकासाठीचे निकने प्रेम जगजाहिर केले होते. निकची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.

- Advertisement -