प्रियांकाचा पती निक जोनसचा वयाच्या १३ व्या वर्षापासून डायबिटीजशी लढा, शेअर केली भावनिक पोस्ट

Nick Jonas pens post on being diagnosed with diabetes at 13: I was devastated frightened
प्रियांकाची पती निक जोनसचा १३ व्या वर्षापासून डायबिटीजशी लढा, शेअर केली भावनिक पोस्ट

बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंत अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांची जोडी आज सिनेसृष्टीत ‘मोस्ट फेव्हरेट कप’ म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर नवनव्या फोटोंमधून ही जोडी चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. यातून देसी गर्ल प्रियांका आणि निक नेहमीच चाहत्यांची मनं जिंकण्यात आघाडीवर असतात. दोघांच्या रोमॅंटिक फोटोंना चाहत्यांकडूनही पसंती दिले जाते. मात्र काही दिवसांपूर्वी नेहमी हसत, मज्जामस्ती करत दिसणाऱ्या प्रियांकाने एका गंभीर आजाराचा सामना केल्याची माहिती उघड केली होती. प्रियांका अस्थमा अर्थात दमा या गंभीर आजाराने ग्रस्त होती. मात्र यातून ती सुखरुपपणे बरी झाली आहे. अशातच आता निक जोनसनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो वयाच्या १३ व्या वर्षापासून डायबिटीज या आजाराने त्रस्त असल्याचा खुलासा केला आहे.

निकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये निकने त्याला टाइप १ डायबिटीज आजार असल्याचे म्हटले आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तर अनेक चाहत्यांना हे वाचून धक्काच बसला आहे. निक जोनासने ‘डायबिटीज मंथ’च्या निमित्ताने ही पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये निक जोनसने लिहिले की, “गेल्या १६ वर्षांपासून तो डायबिटीज आजाराशी लढा देतो. ‘डायबिटीज मंथ’ सुरू आहे आणि दररोज मी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवर #SeeDiabetesHeroes च्या पोस्ट पाहतो. माझ्या डायबिटीज आजाराचे निदान होण्याला आज १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी १३ वर्षांचा होतो, माझ्या भावांसोबत खेळत होतो…. मला शरीरात काहीतरी चूकीच होतयं, असं वाटत होतं… म्हणून मी माझ्या आई-वडीलांकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, मला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. यावेळी माझी लक्षणे पाहिल्यानंतर, डॉक्टरांनी मला सांगितले की मला टाइप १ डायबिटीज आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

निक जोनासने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘मी खूप खचून गेलो, घाबरलो होतो. याचा अर्थ असा होतो का की, माझे प्रवास करण्याचे आणि माझे गाण्याचे स्वप्न संपले आहे? पण मी स्वत:ला वचन दिले होते, जसा मी नेहमी होतो. त्या गोष्टी मला कमी करायच्या नाहीत किंवा थांबायच्या नाहीत.कठीण दिवस आहेत, परंतु माझ्याकडे एक आधार आहे ज्यामुळे मी पुढे जाऊ शकतो, जेव्हा मला खूप वाईट वाटत असेल तेव्हा स्वतःकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे. निक जोनासच्या या भावनिक पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असून प्रत्येकजण त्याच्या धाडसाचे कौतुक करत आहे. निकची पत्नी प्रियांका चोप्रानेही कौतुक करत त्याला प्रोत्साहन दिले.

निक जोनासच्या डायबिटीज आजाराविरोधातील या लढाईत प्रियांकाची मोठी भूमिका आहे. वर्कआऊटपासून ते खाण्यापिण्यापर्यंत प्रियांका त्याची विशेष काळजी घेते. प्रियांका आणि निक यांनी डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले. दोघांनी त्याच वर्षी मे महिन्यात एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.


‘या’ गंभीर आजारातून वाचली प्रियांका चोप्रा, जाणून घ्या हा आजार कोणता आणि लक्षणे!