Priyanka Chopra-Nick Jonas: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे निकने शेअर केला प्रियंकासोबतचा रोमँटिक फोटो

निकने दोघांचा फोटो शेअर करत ते त्यांच्या आयुष्यात किती खुश आहेत हे दाखवून दिले

nick jonas share romantic photo with priyanka after rumours of divorce
Priyanka Chopra-Nick Jonas: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे निकने शेअर केला प्रियंकासोबतचा रोमँटिक फोटो

अभिनेत्री प्रियंता चोप्राची सध्या एकाच गोष्टीमुळे चर्चा आहे ती म्हणजे तिचा घटस्फोट. जेव्हा पासून प्रियंकाने तिच्या सोशल मीडियावरुन नावापुढून जोनस हे आडनाव काढून टाकले आहे तेव्हापासून निक आणि प्रियंकाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे प्रियंका आणि निक त्यांच्या दुनियेत महशूल आहेत. निकने प्रियंकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या आधी देखील निकने दोघांचा एक फोटो शेअर केला होता. त्यावरुनही त्यांच्यात सगळ काही व्यवस्थित असल्याचे संकेत मिळाले होते मात्र तरीदेखील दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा संपल्या नाही.यावेळी पुन्हा निकने दोघांचा फोटो शेअर करत ते त्यांच्या आयुष्यात किती खुश आहेत हे दाखवून दिले आहे.

‘सगळ्यांना हॅपी थॅक्सगिव्हिंग! सगळ्यांचा आभारी आहे!’,  असे म्हणत निकने दोघांचा फोटो शेअर करत घटस्फोटांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. या आधी प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी दोघांच्या नात्याविषयी खुसाला केला होता. प्रियंका आणि निक यांच्या घटस्फोटोच्या चर्चा अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील केले होते.

‘द जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ ही सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. हा एक कॉमेडी शो आहे. प्रियंकाने सोशल मीडियावर यातील एक छोटी क्लिप शेअर केली होती. ज्यात ती निक आणि त्याच्या भावंडांसोबत मज्जा मस्ती करताना दिसत आहे.

तर प्रियंकाच्या ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ या नव्या सिनेमाचे पोस्टर देखील लाँच झाला आहे. १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रियंकाच्या या सिनेमासाठी तिचे भारतीय फॅन्स देखील फार उत्साही आहेत.


हेही वाचा – प्रियंका आणि निक जोनसच्या घटस्फोटाबाबत मधू चोप्रा यांनी केला खुलासा, म्हणाल्या…