Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन nick Jonas दाजींचा नादखुळा स्वॅग,चक्क सोलापुरी चादरीचा घातला शर्ट

nick Jonas दाजींचा नादखुळा स्वॅग,चक्क सोलापुरी चादरीचा घातला शर्ट

निकने सेंट लूईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान हा सोालपुरी जेकार्ड चादरीचा शर्ट घातला होता

Related Story

- Advertisement -

सेलिब्रिटी त्याचा लूक परफेक्ट दिसावा यासाठी अनेक कॉस्मेटिक्स ,वर्क्रआऊट,डाएट यावर विशेष लक्ष देतात. याचप्रमाणे प्रत्येक सिनेमा,प्रमोशन इव्हेंट असो किंवा पॅपराझीच्या कॅमेरात कैद होणे असो यासाठी सेलिब्रिटी नेहमी अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करत आपल्या आऊटफीटवर लाखो रुपये खर्च करतात. सध्या देसी गर्ल प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra jonas)पती पॉप स्टार निक जोनस (Nick Jonas)त्याच्या एका आऊटफीटमूळे भलताच चर्चेत आला आहे. निकचा या आऊटफीटचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निकच्या या आऊटफीची इतकी चर्चा का होत आहे?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण निकने अमेरिकेतून नाही तर खास महाराष्ट्रातील एका भागातून हा खास आऊटफिट तयार करून घेतला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये निकने चक्क सोलापूरी चादरीप्रमाणे कपड्याचा एक शर्ट परिधान केला आहे. यामूळे सध्या निकचा हा पेहराव महाराष्ट्रामध्ये भलाताच चर्चेत आला आहे.निकने तर या आऊटफीटमधील एक झकास फोटो शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन देखील दिलं आहे.”या कपड्यांनी ऊब दिली’ असे त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

- Advertisement -

निकने सेंट लूईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान हा सोालपुरी जेकार्ड चादरीचा शर्ट घातला होता. ही चादर सोलापुरातील चाटला टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये तयार झाली असल्याचे कळतेय तसेच निकच्या या चादरीच्या शर्टाच्या बाहींवर चाटला आर हा ट्रेडमार्क देखील लिहलेला दिसत आहे. यामुळे या कंपनीचे मालक गोवर्धन चाटला यांनाही निक जोनसने घातलेला शर्ट पाहून आश्चर्य वाटले


- Advertisement -

हे हि वाचा – Sakinaka Rape Case – तिचीच चूक असणार!, अभिनेत्री हेमांगी कवीची संतप्त प्रतिक्रिया

- Advertisement -