Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन निक प्रियांकाच्या 7 महिन्याच्या चिमुकलीची स्विमींग पूलमध्ये मस्ती

निक प्रियांकाच्या 7 महिन्याच्या चिमुकलीची स्विमींग पूलमध्ये मस्ती

Subscribe

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वारंवार ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, प्रियांकाने काही फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यावर्षीच्या सुरूवातीलाच आई-वडील झाले. सरोगसीच्या माध्यमातून त्यांना एक सुंदर मुलगी झाली. प्रियांका आणि निकने तिचं नाव मालती मेरी असं ठेवलं. आत्तापर्यंत प्रियांका आणि निकने आपल्या मुलीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु आपल्या मुलीचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. याचं दरम्यान प्रियांका आणि निकने मालती मेरीसोबत स्वीमिंग पुलमधील फोटो शेअर केला आहे. जो पाहून अनेकांना मालतीची काळजी वाटू लागली आहे.

प्रियांका आणि निकची मुलीसोबत स्वीमिंग पुलमध्ये मजामस्ती
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वारंवार ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, प्रियांकाने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रियांका निक आणि तिच्या मुलीसोबत दिसत आहे.

- Advertisement -

सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण सोशल मीडियावर युजर्सना प्रियांकाच्या लेकीची काळजी वाटू लागली आहे. अनेकजण कमेंट्स करू लागले आहेत, त्यांपैकी एकाने लिहिलं की, ७ महिन्याच्या मानाने मालती खूपचं कमजोर दिसत आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, मालतीची खूप काळजी घ्यायला हवी.

- Advertisement -

प्रियांका जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक
प्रियांका चोप्रा ही आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. चमकदार अभिनयासाठी तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2016 मध्ये, भारत सरकारने प्रियांका चोप्राला पद्मश्री देऊन सन्मानित केले तकर टाइम मासिकाने तिला जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केले. फोर्ब्सने तिला जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीतही स्थान दिले आहे.


हेही वाचा :सोनालीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट 11 ऑगस्टला झळकणार ओटीटीवर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -