सध्या मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक वर्ग विशेष वळताना दिसत आहे. या झगमगत्या सिनेविश्वात आता नाटकांकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर प्रेक्षकवर्ग ही रंगभूमीला प्राधान्य देताना दिसतोय. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याची एकाच वेळी दोन नाटकं सुरु असून तो रंगभूमी गाजवताना दिसत आहे आणि हा मालिका विश्वातील मराठमोळा लोकप्रिय चेहरा म्हणजेच ‘लागिरं झालं जी’मधून विक्या म्हणून घराघरात पोहचलेला निखिल चव्हाण. निखिलने आजवर अनेक मराठी मालिका वेब सिरिज, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (Nikhil Chavan playing important role in all the best play)
एकाचवेळी 2 नाटकांत साकारतोय महत्वाची भूमिका
आता रंगभूमी गाजवणाऱ्या देवेंद्र पेम लिखित, दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातून तो रंगमंच गाजवणार आहे. या नाटकांत अभिनेता अंकुश चौधरीने मुलसंच्यात साकारलेलं पात्र आता निखिल साकारणार आहे. आजवर या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिले आणि आता यानंतर निखिलही त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकायला सज्ज झाला आहे.
View this post on Instagram
याशिवाय निखिल अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर ‘तू तू मी मी’ या नाटकांत रंगभूमी शेअर करत आहे. भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित आणि केदार शिंदे लिखीत व दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ या नाटकांत देखील निखिल अंकुश चौधरीने साकारलेली भूमिका साकारत आहे.
भरत सरांमुळे मी रंगभूमीशी जोडला गेलो
या दोन्ही नाटकांबद्दल बोलताना निखिल म्हणाला, ‘आजवर मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. आता मी रंगमंचावर परतलो असून एक नाही तर दोन नाटक एकाचवेळी मी सादर करत आहे. ”ऑल द बेस्ट” हे नाटक कोणालाच नवं नाही आणि अशा गाजलेल्या नाटकांत मला काम करण्याची संधी मिळतेय हे माझं भाग्य. ऑल द बेस्ट मध्ये मी आंधळ्याची भूमिका साकारत आहे. जे बरंच चॅलेंजींग आहे’.
View this post on Instagram
‘देवेंद्र सर आणि मयुरेशने खूप उत्तमरित्या तालमी घेतल्यामुळे मला ते सहज सोपं झालं. भरत सरांमुळे मी रंगभूमीशी जोडला गेलो. आजवर साऱ्या प्रेक्षकांनी माझ्या कामाचं नेहमीच कौतुक केलं आहे आणि आता रंगमंचावरीलही माझ्या अभिनयाला तशीच दाद मिळेल अशी आशा करतो’.
हेही पहा –
Tabu : हाही व्हॅलेंटाईन्स सुना सुना, वयाच्या 54 व्या वर्षीही सिंगल जगतेय तब्बू