Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन निखिल महाजन दिग्दर्शित 'रावसाहेब'चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

रावसाहेब' या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर सरकारने थेटरसह चित्रपट चित्रीकरणास देखील बंदी घातली होती. अशातच सर्व प्रेक्षक मनोरंजनाकरीता ओटीटी प्लॅटफॉमकडे वळल्याचे दिसतेय. यामुळे ओटीटीवर आता नवनवीन वेबसिरीज, वेबफिल्म, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातच आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. लेखक, दिग्दर्शक निर्माता निखिल महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘रावसाहेब’ या आगामी चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. ‘रावसाहेब’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, आणि निखिल महाजन यांनी केले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता हा चित्रपट वन्यजीवनावर आधारित असल्याचे दिसतेय. या चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे बायस, जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhil Mahajan (@nikmahajan)

- Advertisement -

चित्रपटाविषयी लेखक, दिग्दर्शक, निर्माता निखिल महाजन म्हणतात,”आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘रावसाहेब’ चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, यापेक्षा मोठी भेटवस्तू असूच शकत नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळतेय, हेच खूप मोलाचे आहे आणि या चित्रपटाविषयी मी आत्ताच काही सांगणार नाही. मात्र हा विषयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की!”


हे हि वाचा –BiggBossOTT:ईदच्या मुहूर्तावर भाईजानने दिलं बिग बॉसच्या चाहत्यांना स्पेशल सरप्राइज

- Advertisement -