घरमनोरंजननिखिल वागळेंवरील हल्ल्यानंतर मराठी अभिनेत्यांची संतप्त पोस्ट

निखिल वागळेंवरील हल्ल्यानंतर मराठी अभिनेत्यांची संतप्त पोस्ट

Subscribe

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात “निर्भय बनो” या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला. गाडीच्या काचा फोडून शाईफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने व एका मराठी अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

वीणा जामकरची पोस्ट
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकरने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. “सन्माननीय निखिल वागळे, चौधरी सर आणि असीम सरोदे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वीणाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय ‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने यांनी देखील यासंदर्भात पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

किरण माने यांची पोस्ट
किरण माने लिहितात, “सर्व काही लक्षात राहणार…दिवसा तोंडावर गोड गोड गोष्टी करायच्या…’एव्हरीथिंग इज वेल’ असं सांगायचं आणि रात्र होताच हक्क मागणाऱ्या लोकांवर लाठीचा वापर करायचा, गोळ्या झाडायच्या. आमच्यावर हल्ला करून, आम्हाला हल्लेखोर भासवून…सर्व काही आमच्या लक्षात राहील! निखिल वागळे यांचा खूप अभिमान आणि प्रेम – किरण माने”

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?
निखिल वागळेंनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबाबत केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. निखिल वागळे हे पुण्यातील ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमात हजेरी लावणार होते. पोलिसांनी निखिल कार्यक्रमाला न जाण्याची त्यांना विनंती केली होती. पण निखिल वागळे हे कार्यक्रमाला जाण्यावर ठाम होते. निखिल वागळे जेव्हा कार्यक्रमाला निघाले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची गाडी कार्यक्रमस्थळी येताच त्या ठिकाणी गाडीची पुढची काच फोडण्यात आली, काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुदैवाने निखिल यांना दुखापत झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -