घरमनोरंजन'बिग बॉस' फेम निक्की तांबोळी चे बॉलिवूडमध्ये पदार्पण?

‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळी चे बॉलिवूडमध्ये पदार्पण?

Subscribe

बिग बॉस १४ ची सदस्य निक्की तांबोळी ही आता बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. निक्कीने दक्षिणात्या चित्रपटात काम केले आहे. आता ती बॉलिवूडमध्येही दिसणार आहे.

‘बिग बॉस १४’ मधील सर्वात चर्चेत राहिलेली स्पर्धक ‘निक्की तांबोळी’ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. टास्क खेळण्याची पद्दत आणि घरातील सदस्यांसोबत झालेली भांडणं यांमुळे निक्की कायम चर्चेत राहिली. विशेष म्हणजे तिच्या बिनधास्त अंदाजामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ‘निक्की तांबोळी’ ची ही वाढती लोकप्रियता पाहता आता तिला बॉलिवूडमधून चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्याचे पाहायला मिळतयं. ‘निक्की तांबोळी हे दक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

‘कंचना ३’ या दक्षिणात्या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री निक्की तांबोळी ने बिगबॉस पूर्वीच दक्षिणात्य कलाविश्वात तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कंचना ३ ,’चिकती गदोलो’ आणि ‘थिप्पारा मीसम’ अशा चित्रपटात ती झळकली होती. आता ती बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत स्वत: निक्कीनेच सांगितले आहे. बिग बॉस १४ चे पर्व संपल्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयीचे संकेत दिले होते. त्यामुळे निक्की आता नेमक्या कोणत्या  चित्रपटात दिसणार आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. निक्की ही तिच्या येत्या बॉलिवूड चित्रपटात ती कोणत्या सह-कलाकारांबरोबर काम करणार हे आपल्याला लवकरच समजेल.

- Advertisement -

हे ही वाचा- मिताली मयेकरचा दोस्तीवाली फ्रेम, हॅशटॅग प्रेम; गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -