घरमनोरंजननीना गुप्ता स्वतःच्या लग्नाची शॉपिंग करत होती अन् शेवटच्या क्षणी समोरून आला...

नीना गुप्ता स्वतःच्या लग्नाची शॉपिंग करत होती अन् शेवटच्या क्षणी समोरून आला नकार !

Subscribe

नीना गुप्ताने पुस्तकात नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधिल 80 च्या दशका पासुन ते मुंबईमध्ये दाखल होण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने सोमवारी दिग्गज अभिनेत्री नीना गुप्‍ता (Neena Gupta) यांच्या ऑटोबायॉग्राफी ‘सच कहूं तो’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. यादरम्यान करीनाने इंस्‍टाग्रामवर नीना गुप्ता सोबत एका छोट्याश्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला. या गप्पादरम्यान नीना सोबत एकटेपणाबद्धल करीनाने मन-मोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळेस नीनाने तिच्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला. ” मी जेव्हा मुंबईत आली होती त्यावेळेस काही छोट्या-मोठ्या लव अफेअर व्यतीरिक्त माझ्या जीवनात खरा असा कोणताच व्याक्ती आला नाही. जेव्हा मी पुस्तक लिहित होते तेव्हा मला अनुभव आला की माझ्या आयुष्याच्या उत्तम काळात कोणताही प्रिय व्यक्ती माझा नवरा,प्रेमी माझ्या जीवनात नव्हते. विवियनची साथ देखिल काहिश्या अशाच प्रकारची होती. तो स्वत: च्या आयुष्यात व्यस्त होत. कधी- कधी मला भेटायला येत असे.” मुलाखती दरम्यान नीनाने एका व्यक्ती सोबत  ठरले असल्याचे सांगितले आणि शेवटच्या क्षणी लग्न मोडले. त्यावेळेस नीना कपड्यांची खरेदी करत होती. या घटनेचा देखिल खुलासा केला. लोकं मला नेहमी बोलतात, मी माझे जीवन माझ्या मर्जीने जगत आहे. पण असे नाहिये मला सुद्धा नॉर्मल फॅमिली,मुल,घर,नवरा ,सासुसासरे यांनी फुललेला परिवार हवा आहे.मी जेव्हा इतर लोंकाना पाहते तेव्हा मला सुद्धा काहिश्या प्रमाणात जळन होते. मी आरोप किंवा दोष देत नाहिये,मला व्यसनाची सवय लागली नाही कारण मला जे हवं आहे ते नाही मिळू शकलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ताने पुस्तकात नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधिल 80 च्या दशका पासुन ते मुंबईमध्ये दाखल होण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.तसेच कशा प्रकारे सिगंल पॅरेंटहूडमध्ये न डगमगता प्रवास केला,बॉलिवूडमध्ये होणारे राजकारन,कास्टिंग काऊच यासारख्या कठीन काळाचा अनुभव नीन गुप्ताने पुस्तकात मांडला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – राखीचा ड्रामा कधी संपणार? राखीची अजब योगा स्टाईल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -