वैभव तत्ववादी ‘निर्मल पाठक’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तवतेची जाणीव करून देणारी निर्मल पाठक कि घर वापसी हि नवी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेब सिरीज मध्ये स्पेशल ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बिहार राज्यातील एका लहानश्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘निर्मल पाठक कि घरवापसी‘ (nirmal pathak ki ghar wapasi) हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीजमध्ये मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असे म्हटले जाते कि आपण आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडलो, कि आपल्यात बदल हा होतोच. वास्तवाची जाणीव करून देणारा हा विषय या सिरीजमध्ये अगदी मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे.

निर्मल पाठक कि घरवापसी (nirmal pathak ki ghar wapasi) या वेब सिरीजमध्ये स्पेशल ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिरीजमधून वास्तवतेची जाणीव करून दिली आहे. निर्मल पाठक या तरुणाभोवती हि कथा फिरते. तब्बल २४ वर्षांनंतर हा तरुण त्याच्या मूळ गावी परतला असून त्याचे मूळ गाव शोधण्याच्या प्रवासातूनच हि गोष्ट पुढे जाते. निर्मल पाठक हि व्यक्तिरेखा काहीशी लाजाळू आणि संकुचित स्वभावाची आहे.

मी सुद्धा निर्मल पाठकसारखाच –

या वेब सिरीजमध्ये अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) याने निर्मल पाठक हि मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेबाबत वैभव तत्ववादी सांगतो की, “हि वेब सिरीज आपल्या समाजाबाबत बरंच काही सांगते. आणि अश्या या वेब सिरीजचा मला भाग होता आलं म्हणून मी खूप आनंदित सुद्धा आहे. आपले मूळ शोधणाऱ्या मुलाची कथा आहे. निर्मल पाठक (nirmal pathak) हा लाजाळू आणि संकुचित वृत्तीचा मुलगा आहे.”

“काही अंशी मी सुद्धा तसाच आहे. आणि त्यामुळेच हे पात्रं करताना मी त्या भूमिकेमध्ये सहजपणे सामावून गेलो. वेब सीरिजच्या नावाशी संलग्न असलेली भूमिका करायला मिळणं हि अभिनेता म्हणून आपल्यासाठी खूप खास गोष्ट असते”, असं हि वैभव म्हणाला. त्याचबरोबर ‘वास्तविक जीवनातही मी निर्मल पाठक(nirmal pathak) सारखाच आहे. म्हणून ती व्यक्तिरेखा साकारतानाही वेगळी भावना मनात आली’, असेही त्याने सांगितले.

या वेब सिरीजचे लेखन राहुल पांडे यांनी केले आहे. दिग्दर्शन राहुल पांडे आणि सतीश नायर यांनी केले आहे. त्याचबरोबर या वेब सिरीजमध्ये वैभव तत्ववादी सोबत अलका आमिन, विनीत कुमार, पंकज झा, आकाश मखिजा, कुमार सौरभ, इशिता गांगुली आणि गरिमा श्रीवास्तव हे कलाकार झळकणार आहेत.

‘निर्मल पाठक (nirmal pathak) कि घरवापसी’ हि वेब सिरीज २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात आणि निर्मल पाठकच्या या प्रवासात काय घटना घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – ‘हे’ अभिनेते आहेत खरे ‘रिअल लाईफ हिरो’, कोणी कर्नल तर कोणी मेजर