Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बाहुबली फेम देवसेनाच्या 'नि:शब्दम' चे चित्रीकरण पूर्ण

बाहुबली फेम देवसेनाच्या ‘नि:शब्दम’ चे चित्रीकरण पूर्ण

राजामौलीच्या बाहुबली चित्रपटानंतर प्रभास प्रमाणेच अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

Related Story

- Advertisement -

बाहुबली सिनेमाच्या माध्यमातून देवसेना म्हणून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या आगामी ‘नि:शब्दम’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. एका ट्विटर संदेशाद्वारे निर्माते कोना वेंकट यांनी ही माहिती सिनेरसिकांना दिली. नि: शब्दम चा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता.

नि:शब्दम् चित्रपटाद्वारे आर माधवन म्हणजेच रंगनाथन माधवन आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी ‘ रेडू ‘ नंतर पुन्हा एकत्र येणार आहे. अनुष्का शेट्टी आणि आर माधवन शिवाय या चित्रपटात अभिनेत्री अंजली, शालिनी पांडे, माइकल मॅडसन आणि सुब्बाराजू सारखे मोठं-मोठे कलाकार आहेत. नि: शब्दमचे दिग्दर्शन हेमंत मधुकर करणार आहेत तर निर्मिती कोना वेंकट यांच्या कोना फिल्म फॅक्टरी या निर्मिती संस्थेद्वारे केली जाणार आहे.

- Advertisement -

एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटानंतर अनुष्का शेट्टी काही दिवस रुपेरी पडद्यापासून दूर होती. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ भागामती ‘ चित्रपट नंतर जवळपास एक वर्षाने अनुष्का शेट्टी यांच्या आगामी चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.

एका सामान्य कुटुंबातून समोर आलेली अनुष्का शेट्टीनी गेल्या १४ वर्षात तेलुगू आणि तामिळ चित्रपटात विविध भूमिका बजावत स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. एस. एस. राजामौलीच्या बाहुबली चित्रपटानंतर प्रभास प्रमाणेच अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

- Advertisement -