मराठी, हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या निशिगंधा वाड यांच्याबाबत चिंताजनक वृत्त समोर आलं आहे. सुमन इंदोरी या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. या मालिकेत निशिगंधा सुमित्रा मित्तल हे पात्र साकरत आहे.
शूटिंगदरम्यान घडलेल्या या भयंकर घटनेने कलाकार आणि क्रूला ही धक्का बसला आहे. निशिगंधा एक सिक्वेन्स शूट करत असताना घसरल्या आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर, कलाकार आणि क्रू यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले.
निशिगंधा वाड यांच्या अपघाताबाबत प्रॉडक्शन टीममधील एका व्यक्तीने सांगितलं की, हा अनपेक्षित अपघात होता. निशिगंधा मॅडम धोक्याबाहेर असल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. त्या एक फायटर आहेत. त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. याशिवाय प्रॉडक्शनकडून चाहत्यांना एक आश्वासन देण्यात आलं आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली जाईल.
दरम्यान, 90 च्या दशकातील मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. निशिगंधा वाढ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्या घर संसार, शेजारी शेजारी, बाळा जो जो रे, प्रेमांकूर, माणूस, नवरा माझ्या मुठीत गं, गृहप्रवेश. माणूस, बंधन, वाजवा रे वाजवा, रंग प्रेमाचे, जन्मठेप, लई झकास यांसारख्या अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांची मन जिंकत आल्या आहेत. मराठी नंतर निशिगंधा वाड यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील नाव अजमावलं आणि सफलता मिळवली.
Edited By : Nikita Shinde