Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन मालदिवमध्ये भारतीयांसाठी नो एन्ट्री, सोशल मीडियावर मिम्स व्हायरल....

मालदिवमध्ये भारतीयांसाठी नो एन्ट्री, सोशल मीडियावर मिम्स व्हायरल….

मालदीवमधील पर्यटन मंत्रालयाने सोमवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Related Story

- Advertisement -

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आता कोरोना विषाणूची दुसरी लाटही भयंकर रुप घेताना दिसत आहे. सर्वच क्षेत्रांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. रोजची वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. देशात कोरोनाव्हायरसचा प्रसार होवू नये म्हणून भारतातून येणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर बंदी घातली आहे. यात मालदीवचाही समावेश आहे. मालदीवमधील पर्यटन मंत्रालयाने सोमवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी २७ एप्रिलपासून भारतातून मालदिवला येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातली आहे. मालदिवमधील पर्यटन मंत्रालयाने एक ट्विट शेअर करत ही माहिती दिली आहे. या निर्णयाच्या अधिकृत घोषणेनंतर मीमसेना सोशल मीडियावर सज्ज झाली आहे.

 सध्या सोशल मीडियावर #Maldives हा ट्रेंड सुरु झाला आहे. भारतावर कोरोनाचे संकट सुरु असताना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मालदिवला फिरायला गेले होते. मात्र आता मालदिवमध्ये भारतातील प्रवाशांवर बंदी घातली असल्याने बॉलिवूड कलाकारांवर मजेदार मीम्स व्हायरल होत आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, या सेलिब्रिटींनी मालदीववारी केली. पण आता त्यांच्याबाबत अनेक मीम सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मालदीव व्हेकेशनची चर्चा सर्वत्र होत आहे. बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने कलाकारांना यावरून सुनावलेसुद्धा आहे. देशात कोरोनाने परिस्थिती गंभीर बनली आहे. “इथे लोकांना दोन वेळचं जेवण नीट मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाच बाळगा”, अशा शब्दांत नवाजुद्दीनने सेलिब्रिटींना फटकारलं होतं. यानंतर अनेक कलाकरांनी मालदिवला जाणाऱ्या कलाकारांवर टिका केली होती.

 मालदीवमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे त्यांनी भारतातून सुट्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश बंदी घातली आहे. याआधी भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यानं जर्मनी, इटली आणि बांगलादेशनं भारतातून येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश बंदी घातली आहे. जर्मनीत तिथले नागरिक परवानगी घेऊनच भारतातून देशात येऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे. इटलीचे नागरिक भारतात असतील तर ते परत येऊ शकतात. मात्र त्यासाठी कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.


हे वाचा-  स्मिता गोंदकरचा नवा म्युझिक व्हिडिओ ‘साजणी तू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

- Advertisement -