Sushant Sucide Case: हत्येचा अद्याप पुरावाच मिळाला नाही – CBI

Sushant Singh Rajput death case

काही दिवसांपूर्वी सर्वेच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास सीबीआयकडे सोपवला होता. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयनं देखील या प्रकरणी सुशांतशी निगडीत असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीतून अनेक माहितीही समोर आली. मात्र अद्याप सुशांतच्या मृत्यूच गुढ उकलण्यात अद्याप काहीच माहिती समोर आली नाहीये. सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांने इंडिया टूडेशी बोलताना दिली.

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुशांतची आत्महत्या या अँगलने आम्ही तपास करीत आहोत. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का याचाही तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांद्वारे जमवण्यात आलेल्या पुराव्यांचा तपास आणि या प्रकरणाशी निगडीत सर्व संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे. अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

आत्तापर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट, संशयितांचे जबाब आणि क्राईम सीन रिक्रिएशनकडे पाहता सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. असं टीमचं म्हणणं आहे. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एम्सच्या फॉरेन्सिक टीमचा अहवाल आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा आणि ऑटोप्सी रिपोर्टही आहे.


हे ही वाचा – धक्कादायक! आत्महत्येच्या २ दिवस आधी रिया होती सुशांतच्या घरी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!