घरमनोरंजनबिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशचा ड्रामा

बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशचा ड्रामा

Subscribe

मराठी बिग बॉसच्या वीकेंड नॉमिनेशनमुळे दर रविवारी रडारड होते. वीकेंडला कोणीतरी त्या खेळातून बाहेर जात असतं. या विकेंडचा डाव मात्र चांगलाच रंगला. महेश मांजरेकरांनी घरातील सदस्यांशी संवाद साधत त्यातील काही स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. प्रत्येक सदस्याकरता त्याच्या स्वभावाला शोभणारी गाणी वाजवण्यात आली आणि सदस्यांनी ते गाणं कोणासाठी आहे हे ओळखायचं होतं. जसं ‘पल भर के लिये हम कोई प्यार कर ले’ हे गाणं सईसाठी होतं तर, ‘ना जाने कहा से आई है’ हे गाणं शर्मिष्ठासाठी, तर ‘नाम बडे और दर्शन खोटे’ हे गाणं जुई गडकरीसाठी वाजवण्यात आलं आणि ते सदस्यांनी देखील अचूक ओळखलं.

वोटिंग मशिन होत्या बंद

- Advertisement -

मागील आठवड्यात ऋतुजाची तब्येत ठीक नसल्याने तिने स्वत:हून रजा घेतली होती. या करणास्तव या आठवड्या वोटिंग मशिन बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे वोटिंगच न आल्यामुळे या आठवड्यात कोणताही सदस्य नॉमिनेट झाला नाही. मात्र, असं असलं, तरी महेश मांजरेकरांनी वीकेंडचा डाव रंगवण्यासाठी चांगलाच ड्रामा केला.

सुशांत, सई आणि मेघा डेंजर झोनमध्ये

- Advertisement -

या आठवड्यात कोणताच सदस्य बाहेर जाणार नाही असं असतानाही महेश मांजरेकरांनी नॉमिनेशचा ड्रामा रचला. सुशांत, सई आणि मेघा हे डेंजर झोनमध्ये आहेत असं सांगण्यात आलं. त्यानंतर सुशांत सुरक्षित असल्याचं मांजरेकरांनी सांगितल्यानंतर बिग बॉसच्या घरात एकच शांतता पसरली. त्यानंतर सई आणि मेघा या दोघी डेंजर झोनमध्ये राहिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सदस्यांना कोण राहणार आणि कोण या घरातून बाहेर जाणार? असं विचारण्यात आलं. यावर मेघा राहणार असं सर्व सदस्यांनी सांगितलं.

मेघाला निरोप

मात्र अखेर मांजरेकरांनी सई सेफ असून मेघाला सगळ्यांचा निरोप घे आणि बाहेर ये असं सांगितले. हे ऐकताच मेघाच्या टीममधील सर्वच सदस्यांना रडू आले. मेघाने देखील सर्व सदस्यांचा निरोप घेतला. मेघा बॅग आणि आपल्या नावाची पाटी घेऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर जात असतानाच मांजरेकरांनी पुन्हा सर्वांना घरात एकत्र येण्यासाठी सांगितलं. सर्व सदस्य पुन्हा परतल्यानंतर या आठवड्यात एकही सदस्य नॉमिनेट होणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं.

आता कोणताच सदस्य घरातून बाहेर गेला नसल्यानं येणाऱ्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार? कोण होणार बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन? काय असतील या आठवड्यातील टास्क? कोणाला घर सोडावे लागणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -