Money Laundering Case : नोरा फतेही चौकशीसाठी ED कार्यालयात हजर, जॅकलीन फर्नांडिसला समन्स

Nora Fatehi, Jacqueline Fernandez summoned by the ED again in money laundering case
Money Laundering Case :नोरा फतेही चौकशीसाठी ED कार्यालयात हजर, जॅकलीन फर्नांडिसला समन्स

सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाली आहे. तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणी आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर असल्याचे दिसत आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री नोरा फतेही दिल्लीच्या ईडी कार्यालयात पोहचली आहे. तिहारमधील सुकेश रंजन प्रकरणात नोराला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी आज नोरा फतेहीची चौकशी केली जाणार आहे. तर जॅकलीनला १५ ऑक्टोबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Nora Fatehi, Jacqueline Fernandez summoned by the ED again in money laundering case
बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर असल्याचे दिसत आहेत.

 

याआधी जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी संबंधित एका प्रकरणात साक्षीदार म्हणून नवी दिल्लीत अनेक तास चौकशी करण्यात आली होती. मात्र उद्या पुन्हा तिला चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेश चंद्रशेखर यांच्याशी मनी लाँड्रिंग प्रकरणात यापूर्वी जॅकलीन फर्नांडिसचे नाव आले होते. मात्र आता नोरा फतेहीचा देखील याप्रकरणाशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. ईडीकडून या प्रकरणाशी संबंधीत व्यक्तींची चौकशी करत आहे. सुकेश चंद्रशेखरद्वारे जॅकलीनला याप्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे जॅकलीनला आता सुकेश चंद्रशेखरसंबंधीत प्रश्न-उत्तरे विचारली जात आहे. जॅकलीनची PMLA कायद्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या चौकशीत ईडीने नोरा आणि जॅकलीनमार्फत सुकेशसह पैशांची देवाण-घेवाण झाली का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


India Coal Crisis : पॉवर ब्लॅकआऊट टळणार? कोल इंडियाचा दिवसापोटी २७० रॅक कोळशाचा पुरवठा