Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Nora Fatehi: नोरा फतेही कोरोनामुक्त! फॅन्सचे मानले आभार म्हणाली...

Nora Fatehi: नोरा फतेही कोरोनामुक्त! फॅन्सचे मानले आभार म्हणाली…

Subscribe

माझ्यासाठी हा फार कठीण काळ होता. मी लवकरच माझे काम सुरू करेन. मात्र त्याआधी मला माझी एनर्जी आणि स्ट्रेथ परत मिळवायची आहे.

अभिनेत्री, डान्सर नोरा फतेही अखेर कोरोनामुक्त झाली आहे. (Nora Fatehi Corona Negative )  नोराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर तिचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे सांगितले आहे. मी पुन्हा नव्या जोशात नव्या ताकदीने येणार आहे असे नोराने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नारो कोरोनामुक्त झाल्याने तिच्या चाहत्यांची चिंता मिटली आहे. ३० डिसेंबर २०२१ ला नोराला कोरोनाची लागण झाली होती. नोराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती पॉझिटीव्ह असल्याचे सांगत तिच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर नोराला त्रास झाला होता. त्याविषीय देखील नोराने तिच्या पोस्टमध्ये सांगितले होते. मात्र आता नोरा पूर्णपणे ठीक झाली आहे.

नोराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हॅलो मित्रांनो, ‘अखेर मी कोरोनामुक्त झाले. तुमच्या प्रेमसाठी आणि प्रार्थनेसाठी आभार. मला अनेकांनी सुंदर मेसेज केले त्यांचेही आभार. माझ्यासाठी हा फार कठीण काळ होता. मी लवकरच माझे काम सुरू करेन. मात्र त्याआधी मला माझी एनर्जी आणि स्ट्रेथ परत मिळवायची आहे. नवीन वर्षात मला खूप काम करायचे आहे. सर्वांनी आपली काळजी घ्या आणि सुरक्षित रहा’.

- Advertisement -

नोरा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर सोशल मीडियावर नोराच्या प्रकृतीचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. मात्र व्हायरल झालेले फोटो जुने असल्याचे नोराने सांगितले होते.माझी तब्येत ठीक असून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचे नोराने म्हटले होते. नोराची प्रकृती कोरोनामुळे फार बिकट झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या मात्र नोराच्या स्पष्टीकरणामुळे त्या अफवांना आळा बसला.

- Advertisement -

नोराच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी गुरु रंधावासोबत एक म्युझिक व्हिडीओत नोराने काम केले होते. नोराचे ‘डान्स मेरी रानी’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.


हेही वाचा – Money Laundering Case : नोरा फतेही चौकशीसाठी ED कार्यालयात हजर, जॅकलीन फर्नांडिसला समन्स

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -