बॉलिवूडमध्ये सर्वच लोक ड्रग्स एडिक्ट नाहीत, ट्रोलर्सना सुनील शेट्टीचं सणसणीत उत्तर

अभिनेता सुनिल शेट्टी बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या स्टार किड्सचा बचाव करण्यासाठी धावून आला आहे. सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांना मागणी केली आहे की, त्यांनी बॉलिवूडच्या या चूकांना माफ करावं

सध्या बॉलिवूडमधून ड्रग्जबाबत अनेक प्रकरणं समोर येत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धार्थ कपूरला ड्रग्ज घेतल्या प्रकरणात चेन्नईच्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. याआधी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला देखील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. बॉलिवूडमधील या सर्व ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूड प्रेक्षक बॉलिवूडवर आपली नाराजी व्यक्त करतात. त्यामुळेच अनेकदा सोशल मीडियावर बॉलिवूड आणि बॉलिवूडमधील चित्रपटांवर बहिष्कार टाकला जातो.

दरम्यान अभिनेता सुनिल शेट्टी बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या स्टार किड्सचा बचाव करण्यासाठी धावून आला आहे. सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांना मागणी केली आहे की, त्यांनी बॉलिवूडच्या या चूकांना माफ करावं आणि बॉलिवूडवर आपलं प्रेम असंच असू द्यावं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

खरंतर सुनील शेट्टीने ड्रग्ज विरोधातील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने बॉलिवूड आणि ड्रग्ज या विषयावर मनमोकळे पणाने भाष्य केले. तेव्हा त्याला बॉलिवूड कलाकारांना ड्रग्जबाबत टारगेट का केले जाते? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सुनील शेट्टी म्हणाला की, “एक चूकी, चोराला गूंड बनवते. मी ३० वर्षापासून या इंडस्ट्रीचा भाग आहे आणि माझे ३०० मित्र आहेत. ज्यांनी आयुष्यात काही नाही केलं. तसेच सध्या अनेक स्टार किड्स ड्रग्ज केसमुळे चर्चेत आले आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये सगळेच ड्रगी नाहीत”.

तसेच सुनील शेट्टी असं देखील म्हणाला की, “जसं नेहमी दाखवलं जात , तसं खरं नसतं. चूक कोणाकडूनही होऊ शकते.त्यांना लहान मूल समजून माफ करा. बॉलिवूड ड्रगीज, बॉयकॉट बॉलीवुड यांसारखे हॅशटॅग लावणं चूकीचे आहे”.

 


हेही वाचा :दीपिका आणि रणवीर आता फक्त भारतातीलच नाही तर आशियातील पॉवर कपल्सपैकी एक