रणवीर-दीपिका नाही तर ‘ही’ फ्रेश जोडी संजयलीला भन्साळींच्या पुढील चित्रपटात

सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भंसाळी आता त्यांच्या नव्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. तसेच या चित्रपटाची कास्टींग देखील कंफर्म केलेली आहे

बॉलिवूड चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी सध्या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या तयारीमध्ये आहेत. ‘पद्मावत’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’च्या भरघोस यशानंतर आता प्रेक्षकांचे लक्ष देखील संजय लीला भंसाळीच्या नव्या चित्रपटाकडे लागून राहिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भंसाळी आता त्यांच्या नव्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. तसेच या चित्रपटाची कास्टींग देखील कंफर्म केलेली आहे.

संजय लीला भंसाळीच्या पुढील चित्रपटात ही जोडी झळकणार

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय लीला भंसाळी त्यांच्या पुढील चित्रपटासाठी एक नवी फ्रेश जोडीला संधी देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार संजय लीला भंसाळीच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री कृति सेननला कास्ट करण्यात येणार आहे.

आदित्य रॉय कपूर आणि कृति सेनन पहिल्यांदा एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by @adityaroykapur

 अभिनेत्री कृति सेनन आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर संजय लीला भंसाळींच्या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत बातमी अजून समोर आलेली नाही. या चित्रपटाशिवाय आदित्य रॉय कपूर ‘ओम-बॅटल विदइन’ मध्ये दिसणार आहे, तसेच कृति सेनन येत्या काळात ‘आदिपुरूष’ मध्ये दिसून येईल. याशिवाय कृति ‘गणपत’, ‘भेडिया’ आणि ‘शहजादा’मध्ये सुद्धा दिसणार आहे.