सुष्मिता सेन नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री होती ‘आर्या’साठी दिग्दर्शकांची पहिली पंसती

डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेली बहुचर्चित आर्या वेब सीरिजमुळे अभिनेत्री सुष्मिता सेननला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. ओटीटीवर या वेबसीरिजने धुमाकूळ घातला. या वेब सीरिजमध्ये सुष्मिताच्या उत्कृष्ट अभिनयाने अनेकांनी कौतुक केले. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का?सुष्मिता सेन या वेब सीरिजसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती. सुष्मिताच्या आधी दुसऱ्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती. परंतु त्या अभिनेत्रीने नकार दिल्याने सुष्मिताला ही भूमिका मिळाली.

ही अभिनेत्री होती दिग्दर्शकांची पहिली पसंती

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

‘आर्या’चे दिग्दर्शक राम माधवानी यांनी ही वेबसीरिज करण्याचा विचार केला तेव्हा ‘आर्या सरीन’च्या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती काजोल होती. या वेबसीरिजसाठी दिग्दर्शक वेब सीरिजची स्क्रिप्ट घेऊन अभिनेत्रीकडे गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोलला ‘आर्य’ची स्क्रिप्ट खूप आवडली होती. पण वैयक्तिक कामामुळे काजोल या वेबसीरिजसाठी तारीख देऊ शकली नाही. ज्यामुळे तिला ही वेबसीरिजमध्ये काम करता आले नाही.

काजोलने नकार दिल्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी ‘आर्या’साठी सुष्मिता सेनला विचारले. या क्राईम वेब सीरिजची स्क्रिप्ट सुष्मिता सेनला खूप आवडली. त्यानंतर सुष्मिताने या वेब सीरिज काम करण्यासाठी होकार दिला. या वेब सीरिजमधील सुष्मिता सेनचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

सुष्मिता सेनने 2 मार्चला दिली होती हृदयविकाराच्या झटक्याची बातमी

सुष्मिता सेनने 2 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. तिने सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही बसवण्यात आले आहेत. मात्र, आता सुष्मिता सेनच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. तिने योगासोबत वर्कआऊटही करायला सुरुवात केली आहे.


हेही वाचा :

बाई गं उन्हात नको बाहेर पडू… सईच्या फोटोंवर चाहत्याची भन्नाट कमेंट