आता फक्त अभिनयच नाही तर ‘या’ चित्रपटाची निर्मिती देखील करणार करिना

या चित्रपटामध्ये करीना एका डिटेक्टिव पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असून ती यामध्ये ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात सुद्धा दिसेल. करीना या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. शिवाय बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट अपयशी ठरला. दरम्यान, येत्या काळात करीना नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये करीना फक्त अभिनयचं नाही तर या चित्रपटाची निर्मिती देखील करणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार असून हा क्राईम थ्रिलरवर आधारित असणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाचे नाव फायनल झालेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, या चित्रपटामध्ये करीना एका डिटेक्टिव पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असून ती यामध्ये ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात सुद्धा दिसेल. करीना या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करीना ऑक्टोबर महिन्यापासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सुरूवातीला लंडनमध्ये होणार आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

करीना करणार ओटीटीवर पदार्पण
करीना कपूर येत्या काळात ओटीटीवर देखील पदार्पण करणार आहे. ती सुजॉय घोष यांच्या ‘द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या चित्रपटात दिसून येईल. या चित्रपटामध्ये जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील मुख्य भूमिका साकारताना दिसून येतील. हा चित्रपट नेटफ्लिक्सव प्रसारित होईल.

आमीर खानचे 100 कोटींहून अधिक नुकसान

एका अहवालात नमूद केले आहे की आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला 100 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, हा चित्रपट बनविण्यासाठी 180 कोटी एवढे बजेट होते. पण त्या तुलनेत हा चित्रपट तेवढी कमाई करू शकला नाही. बॉलिवूड मधील सलमान खान शाहरुख खान यांच्या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपैकी आमिर खानचा ‘लाल सिंघ चड्ढा’ हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला.


हेही वाचा :

‘विक्रम वेधा’चे दुसरे गाणे ‘बंदे’ रिलीज, पाहा गाण्यातील ह्रतिक रोशनचा धमाकेदार अंदाज