घरमनोरंजनआता मराठी मालिका पण गुजरातमध्ये जाणार का? 'माझी तुझी रेशीमगाठ'बद्दल नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

आता मराठी मालिका पण गुजरातमध्ये जाणार का? ‘माझी तुझी रेशीमगाठ’बद्दल नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मागील अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, आता या मालिकेला प्रेक्षक ट्रोल करु लागले आहेत. याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेहा चक्क गुजराती भाषेमध्ये बोलताना दिसत आहे. नेहाला गुजराती बोलताना पाहून नेटकरी मालिकेवर संतापले आहेत. ज्यामुळे आता ही मालिका लवकरात लवकर बंद करावी अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे.

खरंतर, याआधी देखील अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये गुजराती, हिंदी अशा विविध भाषा बोलल्या गेल्या आहेत. मात्र, सध्या महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणाचे पडसाद मनोरंजन क्षेत्रातही उमटलेले दिसू लागले आहेत. असं म्हणत नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

नेटकऱ्यांच्या मते, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत आता हळूहळू मराठी मालिका देखील गुजरातला जाऊ द्या. असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस यांसारख्या प्रकल्पांनंतर आता सॅफ्रनसारखे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जात आहेत. त्यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणांमुळे राज्यातील नागरीकही आपला राग व्यक्त करु लागले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘भेडिया’ चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ गाण्यात श्रद्धा कपूरला पाहताच सोशल मीडियावर ‘स्त्री 2’ची चर्चा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -