बॉलिवूडची अभिनेत्री कृती सेनन हिची धाकटी बहीण नुपूर सेनन लवकरच एका टॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. टॉलिवूडचा सुपरस्टार रवी तेजासोबत ‘टाइगर नागेस्वर राव’ या चित्रपटात ती काम करणार आहे. काही दिवसांपूर्वीच नुपूर सेननने रवीचा पहिला पॅन इंडिया चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटाबाबत नुपूर सेननने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वताः एक पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
नुपूर सेननने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुपरस्टार रवी तेजाचा पॅन इंडिया फिल्म ‘टाइगर नागेस्वर राव’चा एक पोस्टर शेअर केला आहे. यासोबतच तिने चित्रपटाबाबत इतर माहितीसुद्धा दिली आहे, या चित्रपटाला अभिषेक अग्रवाल यांनी प्रोड्यूस केलं आहे. ज्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटालासुद्धा प्रोड्यूस केलं होतं. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन वामसी हे असतील. ‘टाइगर नागेस्वर राव’ या चित्रपटाला २ एप्रिल २०२२ मध्ये लॉन्च केलं जाईल. सध्या या चित्रपटाचे एकच पोस्टर रिलीज केलं गेलं आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, चित्रपटात नुपूर सेनन हिची एन्ट्री झालेली आहे.
हा चित्रपट तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
नुपूर सेननशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आणि मॉडल गायत्री भारद्वाजसुद्धा दिसून येणार आहे. २०१८ मध्ये गायत्री भारद्वाजला FBB कलर्स फेमिना मिस इंडिया युनाइटेड कॉन्टिनेंट्च्या रूपात निवडण्यात आलं होतं. रवी तेजाचा ‘टाइगर नागेस्वर राव’ या चित्रपटाचा भाग बनण्याची माहिती गायत्री भारद्वाजने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्टर शेअर करून दिली आहे. याशिवाय नुपूर सेननने गेल्या काही दिवसात नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत ‘नुरानी चेहरा’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं शूटिंग संपलेलं असून, हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.
हेही वाचा : ‘Bawaal’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी वरुण धवन, जान्हवी कपूरची पॅरिस वारी