घरताज्या घडामोडीशुटिंगदरम्यान अभिनेत्री नुसरत भरुचाला अटॅक, सेटवरचं कोसळली

शुटिंगदरम्यान अभिनेत्री नुसरत भरुचाला अटॅक, सेटवरचं कोसळली

Subscribe

‘प्यार का पंचनामा’ फेम नुसरत भरूचा सध्या आगामी चित्रपट ‘लव रंजन’ शूटिंगदरम्यान व्यस्त आहेत. आज, शनिवारी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नुसरतची तब्येत बिघडली. ज्यानंतर तिला सेटवरून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जोपर्यंत तिला रुग्णालयात नेण्यात आले नाही तोपर्यंत तिच्या कुटुंबियांना सांगितले नव्हते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईच्या एका स्टुडिओमध्ये ‘लव रंजन’ चित्रपटाचे नुसरतचे शूटिंग सुरू होते. २३-२४ दिवसांपासून चित्रपटाचे निर्माते नुसरतसोबत चांगल्याप्रकारे शूटिंग करत होते. परंतु नुसरतला चक्कर आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. त्यामुळे चित्रपटातील इतर कास्टचे पण शूटिंग केले गेले नाही. कारण नुसरत चित्रपटातील अनेक सीनमध्ये आहे. दरम्यान नुसरतशी संपर्क केल्यानंतर तब्येत बिघडल्याच्या बातमीला तिने दुजोरा दिला आणि सांगितले की, ‘डॉक्टरांनी व्हर्टिगोच्या अटॅक असल्याचे सांगितले असून हा तणावामुळे येतो. कोरोनामुळे प्रत्येकाला भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे.’

- Advertisement -

पुढे नुसरत म्हणाली की, ‘मी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक हॉटेलमध्ये थांबली होती. हॉटेल सेट जवळ होते. यामुळे घरातून सेटवर पोहोचण्याचा वेळ आहे, त्यामध्ये बचत होत असल्यामुळे मला बरे वाटत आहे. एके दिवशी जवळपास तीन आठवड्याच्या शूटिंगनंतर मला खूप अशक्तपणा वाटत होता आणि मग शूटिंगवर जाण्यास थांबवले. एक-दोन दिवसात बरे होईल, असा माझा विचार होता. परंतु पुढच्या दिवशी देखील तितकीच बेकार अवस्था होती. पण तरीही मी सेटवर गेली. परंतु काही मिनिटांच हे घडले. मी काहीच करू शकेल नाही. मला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा तिथे पोहोचली, तेव्हा माझी अजूनच अवस्था खराब झाली होती. मला हॉस्पिटलमध्ये वरती घेऊन जाण्यासाठी व्हिलचेअरची गरज पडली होती. तेव्हा माझा ब्लड प्रेशर कमी होऊन ६५/५५ झाला होता. तोपर्यंत आई-वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. दरम्यान मी हॉस्पिटमध्ये दाखल झाली नाही, मी आता घरीच औषध उपचार घेत आहे. पूर्ण तपासणी झाली आहे. मी आजपासून ७ दिवसांची सुट्टी घेतली आहे. डॉक्टरांनी १५ दिवसांसाठी बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.’


हेही वाचा – Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार माजी कर्मचारी झाले साक्षीदार, केले खळबळजनक खुलासे


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -