घरमनोरंजननुसरत जहाँ करतेय यशबरोबर डेटींग ?

नुसरत जहाँ करतेय यशबरोबर डेटींग ?

Subscribe

कधी साडी तर कधी बोल्ड लूकमुळे चर्चेत असलेल्या बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. ही चर्चा त्यांच्या लूकबद्दल नसून खासगी आयुष्याबद्दल आहे. नुसरत आणि त्यांचे पती निखिल यांच्यात बिनसले आहे. यामुळे निखिल एकटाच हिमाचलला फिरायला गेला आहे. आपला हा एकटेपणा त्याने फोटो व व्हिडीओतून शेअर केला आहे. हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhil Jain (@nikhiljainoffcl)

- Advertisement -

नुसरत यांचे उद्योजक निखिल जैन बरोबर २०१९ साली लग्न झाले. सोशल मीडियावर सक्रिय असल्याने नुसरत नेहमीच पतीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायच्या. पण गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये खटके उडू लागले आहेत. त्याचे कारण आहे अभिनेता यश दासगुप्ता. नुसरत आणि यश यांनी एसओएस कोलकता या चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघे चांगले मित्रही आहेत. पण त्यांच्यातील हीच मैत्री आता नुसरत आणि निखिल यांच्यातील दुराव्यास कारणीभूत ठरली आहे. नुसरत यशला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरूनच निखिल आणि नुसरत यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर निखिल एकटाच हिमाचलला फिरायला गेला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो  आणि व्हिडीओही शेअर केले असून त्यात नुसरत मात्र दिसत नाहीये. तसेच व्हिडीओमध्ये ‘वफाएं मेरी याद करोगी’ हे गाणही ऐकू येत आहे. यामुळे निखिल हिमाचलमध्ये एकटाच फिरत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -