Nusrat-Yash Baby: बाळाच्या जन्मानंतर नुसरत आणि यश यांचा मोठा खुलासा; म्हणाले…

nusrat jahan and yash dasgupta latest interview after give birth to a baby boy
Nusrat-Yash Baby: बाळाच्या जन्मानंतर नुसरत आणि यश यांचा मोठा खुलासा; म्हणाले...

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ नेहमी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे किंवा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असतात. कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या कलाकारांपैकी त्या एक आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी नुसरत जहाँ आणि यशदास यांनी आपल्या मुलाबाबतचे मौन सोडले आहे. यश म्हणाले की, ‘नुसरत यांनी आपल्या मुलाच्या आयुष्यात राहायचे की नाही, याची निवड तुम्ही करू शकता असे सांगितले होते.’

एका मुलाखतीमध्ये यशदास म्हणाले की, ‘मला बाळ हवे होते, परंतु मी हा निर्णय नुसरतवर सोडला. जेव्हा नुसरत यांनी पहिल्यांदा गर्भवती असल्याचे सांगितले होते. त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तू पुढे जाऊ शकतेस. हे तुमचे शरीर आहे, माझे नाही. त्यामुळे हा तुमचा निर्णय असेल. मी त्यांची साथ कधी सोडणार नाही, हे मी त्यांना सांगितले होते. मला बाळ हवे होते, परंतु मी कधी माझा निर्णय त्यांच्यावर थोपवला नाही. तसेच त्यांनी मला सांगितले होते की, जर पाहिजे असेल तर पुढे जाऊ शकतो, मी मुलाचे पालन करू शकते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

तसेच याबाबत नुसरत म्हणाल्या की, ‘मुलाबाबत ऐकून ते अजिबात घाबरले नाही. हा निर्णय आमच्या दोघांचा होता. आम्ही जगाचा अजिबात विचार केला नाही. कारण मला माहिती होते की, ते मला जगातील मजबूत महिला म्हणतील नाहीतर मला वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे मारतील.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

‘मुलासाठी माझे काही कारण होते. परंतु ज्या लोकांनी याबाबत वाईट गोष्टी केल्या, त्यांचे काय करायचे? मी एकट्या गर्भवती महिलेला एकटे सोडू शकलो असतो का? जगाच्या दृष्टीत हा योग्य निर्णय होता का? हे मला सांगा.’

दरम्यान बंगाली चित्रपटात अनेक वेळा नुसरत आणि यश यांनी एकत्र काम केले आहे. आता दोघेही राजकारणात सक्रीय आहेत. नुसरत यांनी २६ ऑगस्टला ईशान याला जन्म दिला होता. ज्यानंतर पहिल्यांदा नुसरत जहाँ मोकळेपणाने बोलल्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.


हेही वाचा – Happy Birthday Amitabh Bachchan: म्हणूनच बिग बींनी पान मसाला जाहिरात सोडली अन् पैसेही दिले परत