घरताज्या घडामोडीNusrat Jahanने केले यश दासगुप्ता सोबत लग्न? पुन्हा फोटो व्हायरल

Nusrat Jahanने केले यश दासगुप्ता सोबत लग्न? पुन्हा फोटो व्हायरल

Subscribe

नुसरतला प्रेग्नंसीवेळी देखील ट्रोलींगचा सामना करावा लागला होता.

अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan ) तिच्या वयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे सतत चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुसरतने मुलाला जन्म दिला. यीशान असे तिच्या मुलाचे नाव असून मुलाच्या जन्मावरुन देखील नुसरतला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता नुसरतने अभिनेता यशा दासगुप्ता याच्याशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नुसरतने एक फोटो शेअर केला आहे ज्यात लाल आणि सफेद रंगाची साडी नेसली आहे आणि एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे ती दसत आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमुळे नुसरतने लग्न केल्याचा अंदाज नेटकऱ्यांना लावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)


याआधी देखील नुसरतचे यश दासगुप्ता सोबत लग्न झाल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. यशच्या वाढदिवसाला नुसरतने एक फोटो शेअर केला होता. ज्यात केकवर पती पत्नी असे लिहिले होते. यावरुन दोघांचे लग्न झाले आहे असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र नुसरत किंवा यश या दोघांकडून यावर कोणताही खुलासा करण्यात आला नाही. दोघांनीही गुपचूप लग्न केल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या.

- Advertisement -

नवरात्रीनिमित्त यश आणि नुसरत यांना पंडाला येथे स्पॉट करण्यात आले होते. नुसरतचा मुलगा यीशानचा जन्म झाला त्यावेळीस नुसरत आणि बाळाच्या आरोग्याची माहिती यश कडून देण्यात आली होती. यीशानच्या जन्मपत्रिकेवरही यश दासगुप्ताचे नाव असल्याचे समोर आले होते. अनेकांनी तर लग्नाआधीच नुसरत प्रेग्नंट असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

नुसरतला प्रेग्नंसीवेळी देखील ट्रोलींगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी नुसरतने ट्रोलर्सना उत्तर देत म्हटले होते की, लोकांना खरंच माहिती आहे का लग्नाशिवाय मुल झाले आहे. आम्ही काही गोष्टी सांगत नाही याचा अर्थ असा नाही की चर्चा करणारी लोकांचे म्हणणे खरे आहे.


हेही वाचा – शेहनाज गिलला मिळाली दिलजीत दोसांझची साथ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -