‘कुत्ते’ चित्रपटावर पोलीस खात्याकडून आक्षेप; याचिकेवर आज होणार सुनावणी

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, नसीरुद्दीन शाह आणि तब्बू यांचा आगामी चित्रपट ‘कुत्ते’ची मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपटातील पहिले गाणे “आवारा डॉग्स” प्रदर्शित झाले होते. या गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. दरम्यान, अशातच आता हा चित्रपट वादाच्या कचाट्यात सापड्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पोलिसांची वर्दी घातलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्याला कुत्र्यांचे तोंड लावले आहे. ज्यामुळे पोलिस खात्याकडून या चित्रपटावर टीका केली जात आहे. फक्त इतकंच नाही तर एएसपी नरेंद्र चौधरी यांच्या मुलीने चित्रपटाच्या नावावर देखील आक्षेप घेतला असून कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. आता प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच आज(12 जानेवारी) रोजी कोर्टामध्ये या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

‘कुत्ते’ चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

एएसपी नरेंद्र चौधरी यांच्या मुलीद्वारे करण्यात आलेल्या याचिकेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची आणि चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिक दाखल करण्याच्या वकील दीपेश बेनीवाल यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, संविधान चे कलम 21 च्या अंतर्गत देशामध्ये प्रत्येक व्यक्तिला राईट टू लिव विथ डिग्निटीचा अधिकार आहे. परंतु या चित्रपटामध्ये या कलमाचे उल्लखन करण्यात आले आहे. ज्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. आता आज होणाऱ्या सुनावणीवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित
लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, ‘कुत्ते’हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. ‘कुत्ते’हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

होम मिनिस्टर आणि अप्पी आमची कलेक्टर मकरसंक्रांत विशेष भाग