घरमनोरंजन'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने RRR सिनेमाचं 'दोस्ती' साँग चाहत्यांच्या भेटीला

‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने RRR सिनेमाचं ‘दोस्ती’ साँग चाहत्यांच्या भेटीला

Subscribe

बाहूबली सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा करणारे दिग्दर्शक एस एस राजामौली मल्टीस्टारर सिनेमा ‘RRR’ या सिनेमाची चर्चा सध्या सिनेसृष्टीत प्रचंड रंगत आहे. अशातच फ्रेंडशिप डे या स्पेशल दिवसाचं अवचित्त साधून RRR च्या मेकर्सने मैत्री या नात्यावर भाष्य करणारे सिनेमाचं  पहिल-वहील ‘दोस्ती’ हे गाण रिलीज केलं आहे. या गाण्यामध्ये जूनियर एनटीआर तसेच राम चरण यांच्या मैत्रीपुर्ण नात्याचे वर्णन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या या गाण्याला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.तसेच अल्पवधीच हे गाण व्हायरल झालं आहे. राजमौली यांचे सिनेमे नेहमीच बिग बजेट आणि लार्जन दॅन लाईफ असतात. प्रत्येक सीनसाठी मेहनत घेत पाण्यासारखा पैसा खर्च करतात. हा सिनेमासुद्धा त्याच पठडीतला असून आता राजामौली आणखी एक भव्य सिनेमा रिलीज करुन प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवाणी देणार आहे असे म्हणायला हरकत नाही.चाहते देखील सिनेमा कधी रिलीज होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

१९२० मधील प्रसंगावर आधारलेला सिनेमा

सिनेमाच्या कथानकाबद्दल बोलतांना राजामौली सांगितले, “हा सिनेमा काल्पनिक कथेवर अवलंबूनअसून दोन खऱ्या व्यक्तींवर आधारित आहे. हा सिनेमा भव्य स्वरूपात असणार आहे. या सिनेमाकरिता खुप संशोधन केले गेले आहे.”
RRR हा सिनेमा दोन स्वतंत्र सेनानी (अल्लूरी सीतारामा राजू-कोमाराम भीम) यांच्यावर आधारित आहे. १९२० या काळातील प्रसंगावर आधारलेली असणार आहे.  ३५०-४०० करोड इतका बजेट असून या सिनेमात ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण यांचा एग्रेसिव लूक बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेत्री सामंथाने सोशल मीडियावरुन हटवलं पतीचं अडनाव,पतीसोबत झाले भांडण?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -