घरमनोरंजनशोमध्ये माधुरी दीक्षितवर आक्षेपार्ह टिप्पणी; नेटफ्लिक्सला पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस

शोमध्ये माधुरी दीक्षितवर आक्षेपार्ह टिप्पणी; नेटफ्लिक्सला पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस

Subscribe

लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी या प्रकरणी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली असून या शोमधील माधुरीबाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा एपिसोड हटवण्याची मागणी केली आहे

OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix)अनेक प्रकारचे शो दाखवले जातात, हे कार्यक्रम प्रेक्षकही आवर्जून पाहतात. असाच एक नेटफ्लिक्सवरील ‘बिग बँग थिअरी’ (Big Bang Theory) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. दरम्यान, नुकताच हा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे या कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी केला आहे.

नेटफ्लिक्सला पाठवली नोटीस

लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी या प्रकरणी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली असून या
शोमधील माधुरीबाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा एपिसोड हटवण्याची मागणी केली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलंय की, तो एपिसोड काढून टाकण्यात यावा, ज्यामध्ये माधुरी दीक्षितचा अपमान करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

‘बिग बँग थिअरी’ या शोचा दुसरा सीझन सुरु झाला असून दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात शेल्डन कूपरच्या भूमिकेत जिम पार्सन्सने माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची चुकीची तुलना केली आहे. शिवाय तुलना करताना त्याने माधुरीवर एक टिप्पणी केली. ज्यात जिम पार्सन्स म्हणतो की, “ऐश्वर्या राय गरीबांची माधुरी दीक्षित आहे.” यावर उत्तर देत राज कुथरापल्लीच्या भूमिकेतील कुणाल नायर म्हणतो की, “ऐश्वर्या राय देवीसारखी आहे आणि तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित एक वेश्या आहे.” माधुरीबाबतची ही आक्षेपार्ह टिप्पणी ऐकून मिथुन विजय कुमारने नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

प्रतिक्षा संपली! ‘अवतार 2’ ‘या’ दिवशी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -