Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन Oh My God 2: मध्ये दिसणार अक्षय आणि पंकज त्रिपाठीचा अॅक्टिंगचा तडका

Oh My God 2: मध्ये दिसणार अक्षय आणि पंकज त्रिपाठीचा अॅक्टिंगचा तडका

सिनेमाच्या दुसर्‍या भागात परेश रावल यांना रिलेप्स करण्यात आलं असल्याची माहीती समोर आली आहे. आता परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठी यांची वर्णी लागली आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सध्या कमालीचा व्यस्त आहे. अक्षयचा ‘ओह माई गॉड’ (Oh My God) सिनेमाच्या दुसर्‍या भागाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा रंगत आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार आणि अभिनेता परेश रावल यांची धमाल केमिस्ट्री प्रेक्षकांना भरपूर आवडली. पण आता सिनेमाच्या दुसर्‍या भागात परेश रावल यांना रिलेप्स करण्यात आलं असल्याची माहीती समोर आली आहे. आता परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठी यांची वर्णी लागली आहे. कोरोना व्हायरसमुळे चित्रीकरणात अनेक अडचणी येत असल्यामुळे लवकरच याचे शूटिंग सुरू होणार असल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. फिल्म मेकर्सची पंकज त्रिपाठी सोबत अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. तसेच अक्षय कुमार भगवान श्री कृष्ण च्या भूमिकेत दिसणार आहे अशी माहिती समोर आली आहे. सिनेमाच्या प्री प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. महितीनुसार लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास पंकज त्रिपाठी यांचा अक्षय सोबत हा दूसरा सिनेमा असणार आहे. साजिद नाडियाडवालाचा सिनेमा ‘बच्चन पांडे’मध्ये देखील दोघेही कलाकार एकत्र काम करताना दिसनार आहे. पंकज त्रिपाठी यांची गणना अनेक प्रभावी कलाकारांमध्ये करण्यात येते. पंकज त्रिपाठी कोणत्याही पात्रात आपली महत्वपूर्ण छाप सोडतात. बॉलिवूड मध्ये त्यांनी स्वत:चं प्रस्थ निर्माण केलं आहे. तसेच अक्षय आणि पंकज त्रिपाठी यांची जोडी पडद्यावर कश्या प्रकारे कमाल दाखवते हे पाहणं रंजक ठरेल


हे हि वाचा – DID फेम बिकी दासचा रस्ते अपघात,लॉकडाउनमुळे बिकट परिस्थिती ओढवली

- Advertisement -