अरे बापरे ! ‘नागिन ६’चं प्रमोशन करण्यासाठी सेटवर आला खराखुरा नाग; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सेटवर मालिकेचे शूटिंग सुरू आहे, तेवढ्यात एक मोठ्ठा नाग तिथे पोहोतचो, नागाला पाहून सेटवरील सगळ्यांची घाबरगुंडी उडते

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ६’ सध्या टेलिव्हिजनवर जबरदस्त चालतेय. यावेळी ‘नागिन ६’ मध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत दिसत आहे. सध्या या मालिकेचे शूटिंग मुंबई येथील एका स्टुडिओमध्ये सुरू होते. या वेळी अचानक बाजूच्या झाडीमधून एक खरोखरचा नाग त्याठिकाणी आला. सोशल मीडियावर नागिनच्या सेटवरील हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क खराखुरा नाग दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सेटवर मालिकेचें शूटिंग सुरू आहे, तेवढ्यात एक मोठ्ठा नाग तिथे पोहोतचो, नागाला पाहून सेटवरील सगळ्यांची घाबरगुंडी उडते. इतक्यात तिथे उपस्थित असलेले टीम मेंबर्स नागाला एका काटीच्या मदतीने पुन्हा झाडीत नेऊन सोडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejranfansxlayra (@tejranfans1120)

सेटवर अचानक आलेल्या नागाने कोणाला ही काही ईजा पोहोचवली नाही.मात्र हा व्हायरल व्हिडीओ पाहून तेजस्वी प्रकाशचे चाहते चिंतेत पडले आहेत. याशिवाय तेजस्वीला त्यांनी सेटवर शूट करताना आपली काळजी घ्यायला सांगितली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक मजेशीर कमेंट देखील करत आहेत, त्यांपैकी एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “अरे बापरे, असं वाटतंय नागिन ६ चे प्रमोशन करण्यासाठी खरोखरची नागिन आली आहे.”

या व्यतिरिक्त तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या मालिकेमुळे तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वारंवार चर्चेत असते.तेजस्वीला
‘बिग बॉस १५’ मुळे चांगलीच प्रसिद्धि मिळाली होती, तिने ‘बिग बॉस १५’ चे विजेते पद सुद्धा पटकावले होते.


हेही वाचा :“तुमचे नेतृत्व अनुकरणीय…” मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया