HomeमनोरंजनOld Bollywood Movies : ओल्ड इज गोल्ड, व्हेलेंटाईन वीकमध्ये हे सिनेमे पुन्हा...

Old Bollywood Movies : ओल्ड इज गोल्ड, व्हेलेंटाईन वीकमध्ये हे सिनेमे पुन्हा रिलीज होणार

Subscribe

बॉलिवूडमध्ये नियमित वेगवेगळे प्रयोग केले जात असताना जुन्या सिनेमांचा फिव्हर काही उतरेना. आजही प्रेक्षक जुने सिनेमे नवे असल्यासारखे आवडीने पाहतात. अर्थात ‘ओल्ड इज गोल्ड’ आणि ‘असली हीरे की पहचान जौहरी को होती है’ म्हणतात ते काही उगीच नाही. बॉलिवूडच्या अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. त्यापैकी सर्वात सुपरहिट जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. तर यंदाच्या व्हेलेंटाईन वीकची सुरुवात याच जोडीच्या सुपरहिट सिनेमाच्या री- रिलीजने होणार आहे. याशिवाय आणखी काही जुने सिनेमे पुन्हा रिलीज होणार आहेत. त्याविषयी जाणून घेऊया. (Old Bollywood movies are going to be released again)

1. सिलसिला

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन आणि रेखा यांचा 1981 मध्ये रिलीज झालेला ‘सिलसिला’ हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी हा सुपरहिट सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

2. सनम तेरी कसम

2016 साली प्रदर्शित झालेला ‘सनम ‘तेरी कसम’ हा सिनेमा जबरदस्त हिट झाला होता. या सिनेमात हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन मध्यवर्ती भूमिकेत आहेत. हा सिनेमा एक रोमँटिक ड्रामा असून येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा रिलीज होणार आहे.

3. पद्मावत

संजय लीला भंसाली यांचा बिग बजेट सिनेमा ‘पद्मावत’ 2018 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर मध्यवर्ती भूमिकेत झळकले होते. हा सिनेमादेखील पुन्हा एकदा प्रदर्शित होतोय. उद्या (6 फेब्रुवारी) हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

4. बरेली की बर्फी

2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बरेली की बर्फी’ हा सिनेमासुद्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन एकत्र झळकले होते. दोघांची केमिस्ट्री आणि सिनेमाचे कथानक प्रेक्षकांना इतके भावले की हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होतो आहे.

हेही पहा –

Chhava : छावाच्या शुटिंगवेळी विकी- अक्षयने एकमेकांचं तोंडसुद्धा पाहिलं नाही, कारण