घर मनोरंजन 'OMG 2' आणि 'गदर 2' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक

‘OMG 2’ आणि ‘गदर 2’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाचा उत्तम प्रतिसाद देत आहेत. मात्र, अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याची बातमी समोर आली आहे.

अक्षयचा चित्रपट पहिल्याच दिवशी लीक

OMG 2 Controversy: 'OMG 2': CBFC feels content of the Akshay Kumar starrer is 'slightly controversial'; film yet to clearance for release | - Times of India

- Advertisement -

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयचा ‘ओह माय गॉड 2’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट Tamilrockers, Movierulz आणि Torrent सारख्या साईटवर ऑनलाइन लीक झाला आहे. जिथे हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये मोफत डाउनलोड केला जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो.

‘गदर 2’ देखील ऑनलाइन लीक

Gadar 2: The Katha Continues (2023) - Movie | Reviews, Cast & Release Date - BookMyShow

- Advertisement -

केवळ ‘OMG 2’च नाही तर ‘गदर 2’ देखील ऑनलाईन लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील मोठा फटक बसू शकतो.

‘OMG 2’साठी अक्षयने मानधन केले कमी

सुपरस्टार अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेण्याऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पूर्वी अक्षय त्याच्या चित्रपटासाठी जवळपास 50-100 कोटीपर्यंत मानधन घ्यायचा परंतु मागील वर्षी सर्व चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अक्षयने त्याचे मानधन कमी केले आहे. येत्या ‘ओह माय गॉड 2’ साठी अक्षयने जवळपास 35 कोटी रुपये चार्ज केले आहेत. तर पंकज त्रिपाठी यांनी 5 कोटी चार्ज केले आहेत. तर यामी गौतमने 2-3 कोटी चार्ज केले आहेत. अक्षयने केवळ या चित्रपटासाठीच नाही तर ‘छोटे मियां बड़े मियां’ या चित्रपटासाठी त्याचे मानधन कमी केले आहे.


हेही वाचा :  आवडत नसेल तर चिडवू नका… चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सनी देओलने मागितली माफी

- Advertisment -