घरताज्या घडामोडीधक्कादायक! आत्महत्येच्या २ दिवस आधी रिया होती सुशांतच्या घरी, फोटो सोशल मीडियावर...

धक्कादायक! आत्महत्येच्या २ दिवस आधी रिया होती सुशांतच्या घरी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपुत प्रकरणात आज सलग पाचव्या दिवशी सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. या आधी आणि चौकशीदरम्यान सुध्दा रिया ८ जूनला सुशांतच घर सोडल्यानंतर त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नसल्याचं वारंवार सांगत आहे. मात्र रियाचे १२ जूनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून पुन्हा एकदा रियाच्या स्टेटमेंटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण हे फोटो रियाच्या स्टेटमेंटच्या अगदी विरूध्द आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियावर रियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. जे फोटो १२ जूनचे आहेत. हे फोटो सुशांतच्या घरातीलच असल्याचे म्हटलं जात आहे. व्हायरल होणारे हे फोटो एका केक शॉपच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही आहे. हे फोटो रियाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरदेखील शेअर केले होते. त्यावेळी तिनं केक शॉपसह सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीलाही टॅग केलं होतं.

- Advertisement -

सुशांतच्या लिविंग रूममधील फोटो

रियाने हे फोटो ज्या ठिकाणी काढले आहेत, ती सुशांतची लिविंग रूम आहे असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. कारण घरातील एका फ्रेममध्ये अंतराळवीराचा फोटो आहे, या फोटो फ्रेमची बॉर्डर तशीच आहे, जशी सुशांतच्या लिविंग रूममधील फ्रेमला आहे. रियाने ८ जूनला सुशांतचं घर सोडलं तर १२ जून रोजी अपलोड करण्यात आलेले केकसह हे फोटो कधीचे आहेत? की रिया १२ जूनला सुशांतची घरी गेली होती आणि आता ती खोटं बोलतेय असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.


हे ही वाचा – कोरोना लसीबाबत ट्रम्प यांची घोषणा, ‘ज्याचा कोणी विचार केला नव्हता ते आम्ही करून दाखवलं’!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -