Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सलमान खानच्या फिल्म सेटवर मुलींसाठी आहेत 'हे' Rules

सलमान खानच्या फिल्म सेटवर मुलींसाठी आहेत ‘हे’ Rules

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सलमान खान, पूजा हेगडे आणि व्यंकटेश दग्गुबती यांचा हा चित्रपट यावर्षी 21 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला ज्याला चाहते पसंती देत आहेत. शहनाज गिल आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान पलक तिवारीने सलमान खानबद्दल मोठा खुलासा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

प्रमोशनदरम्यानच्या एका मुलाखतीत पलक तिवारीने सांगितलं की, सलमान खानचा त्याच्या सेटवर काम करणाऱ्या महिलांसाठी एक नियम आहे. ती म्हणाली, मी सलमान खानच्या ‘अँटीम’ चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होते. मला वाटत नाही की, सलमान सरांबद्दल हे खूप लोकांना माहीत आहे, पण त्यांचा एक नियम होता ‘माझ्या सेटवर प्रत्येक मुलीची नेकलाइन असावी. सर्व मुली चांगल्या मुलीप्रमाणे पूर्ण झाकलेल्या असव्या, मी घरातून जेव्हा पूर्ण कपडे घालून जायचे तेव्हा माझी आई मला पाहून आश्चर्यचकित व्हायची त्यावेळी तिने मला नक्की कुठे जात आहेस? असं विचारलं. तेव्हा आईला मी सलमान सरांच्या सेटवरील नियम सांगितला. तेव्हा तिने खूप कौतुक केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

- Advertisement -

पुढे जेव्हा पलकला विचारण्यात आले की, सलमान खानने महिलांसाठी असे नियम का बनवले आहेत, तेव्हा ती म्हणाली की, “सलमान सर खूप परंपरावादी आहेत. ते म्हणतात की, ‘तुम्हाला जे पाहिजे ते घाला’ पण ते असेही म्हणतात की, माझ्या मुली नेहमीच सुरक्षित असाव्यात. जर आजूबाजूला अनोळखी पुरुष असतील तर ज्यांना मुली वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत. त्यामुळे मुलगी नेहमी सुरक्षित असावी.” असं पलकने सांगितले.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘Dunki’ चित्रपटातील शाहरुख खानचा First Look आला समोर

- Advertisment -