Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रेक्षकांच्या मागणीवरून ‘द काश्मीर फाइल्स’ पुन्हा चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

प्रेक्षकांच्या मागणीवरून ‘द काश्मीर फाइल्स’ पुन्हा चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

Subscribe

2022 मध्ये सर्वाधिक चर्चेत आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत आता एक नवीन बातमी समोर येत आहे. 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन अनेक राजकीय वादही झाले होते. परंतु तरीही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडोंची कमाई करत 2022 मधील यशस्वी झालेल्या चित्रपटांच्या यादीत आपलं नाव कोरलं होत. दरम्यान, अशातच हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

- Advertisement -

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलंय की, “‘द काश्मीर फाइल्स’ 19 जानेवारी रोजी काश्मीरी हिंदू नरसंहार दिवस असल्याने चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. असं पहिल्यांदाच होतंय की, कोणतातरी चित्रपट एका वर्षात दोन वेळा प्रदर्शित होतोय. जर तुम्ही मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहिला नसेल तर तुमचे तिकिट आताच बुक करा.”

अनुपम खेर यांनी दिलं चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यामागचे कारण

- Advertisement -

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यामागचे कारण अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी लिहिलंय की, “कदाचित असं पहिल्यांदाच होतंय की, एकच चित्रपट एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा प्रदर्शित होतोय. ‘द काश्मीर फाइल्स’ उद्या पुन्हा एकदा प्रदर्शित होईल. काश्मीरी पंडितांच्या नरसंहाराला श्रद्धांजली देण्यासाठी चित्रपट नक्की पाहा.” तसेच या चित्रपटाच्या पोस्टरवर प्रेक्षकांच्या मागणीवरुन प्रदर्शित होणार असल्याचं लिहिण्यात आलं आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ काश्मीरी पंडितांच्या संघर्षावर आधारित
हा चित्रपट काश्मीरी पंडितांच्या संघर्षावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. अनुपम खेर व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, मृणाल जोशी, पल्लवी जोशी हे सुद्धा होते.

 


हेही वाचा :

Cinema Lovers Day निमित्ताने फक्त 99 रुपयांमध्ये पाहा कोणताही चित्रपट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -