घरमनोरंजनमी एकदम ठणठणीत आहे, निधनाच्या अफवेवर,मुकेश खन्ना यांचे उत्तर

मी एकदम ठणठणीत आहे, निधनाच्या अफवेवर,मुकेश खन्ना यांचे उत्तर

Subscribe

मुकेश खन्ना यांनी फेसबुक व्हिडिओच्या आधारे खोट्या अफवा पसरवणाऱ्या तसेच याला दुजोरा देणार्‍या लोकांना चांगलेच फटकारले आहे.

शक्तिमान आणि भीष्म पितामह सारख्या दमदार भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांचे निधन झाले असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकेश खन्नाच्या काही फॅन क्लबने तर या वृत्ताला दुजोरा देत त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. यामुळे अभिनेता मुकेश खन्ना चिंतित झाले असून त्यांनी खोट्या अफवा ना आता पूर्णविराम दिला आहे.मुकेश खन्ना याच्या निधनाची बातमी व्हायरल होताच त्यांना वारंवार घरी अनेकांनी फोन करून तब्येतीची चौकशी करण्यास सुरुवात केली. या घटणेनंतर मुकेश यांनी  एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे संगितले या सोबतच त्यांनी अश्या खोट्या अफवा पासरवणार्‍या लोकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

- Advertisement -

काय म्हणाले मुकेश खन्ना – फेसबुक व्हिडिओ मध्ये मुकेश खन्ना म्हणाले आहे की,” तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुरक्षित आणि पुर्णपणे प्रकृती ठीक आहे. मला नाही माहिती अश्या प्रकारच्या चुकीच्या खोट्या अफवा कोण पसरवत आहे. तसेच या अफवा पसरवणार्‍या लोकांचा मानस काय आहे. ते अश्या प्रकारच्या खोट्या अफवांद्वारे लोकांचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या मानसिक विकृती असणार्‍या लोकांचा कसं आणि काय ईलाज करावा? त्यांच्या चुकीची शिक्षा कोण देणार? आता हद्द पार झाली आहे या अफवाणा पूर्णविराम तसेच लगाम लावावी लागेल. ” मुकेश खन्ना यांनी फेसबुक व्हिडिओच्या आधारे खोट्या अफवा पसरवणाऱ्या तसेच याला दुजोरा देणार्‍या लोकांना चांगलेच फटकारले आहे.


हे हि वाचा – सोनू सुद नंतर गुरमीत चौधरी बनला जनतेचा मसीहा, कोरोना रुग्णांसाठी उभारले हॉस्पिटल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -