घरमनोरंजनवाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनने सिद्धिविनायक मंदिराला भेट देत घेतले बाप्पाचे दर्शन

वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनने सिद्धिविनायक मंदिराला भेट देत घेतले बाप्पाचे दर्शन

Subscribe

यावेळी कार्तिक आर्यन पांढऱ्या शुभ्र कुर्त्यामध्ये सिद्धिविनायक मंदिरात दिसला

बॉलिवूड मधील स्टार अभिनेता कार्तिक आर्यनसाठी 2022 हे वर्ष यशस्वी ठरले आहे. या वर्षी कार्तिकचे जे चित्रपट प्रदर्शित झाले त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला यात शंका नाही. कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली, तर दुसरीकडे या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला होता. बॉलिवूड मधल्या अनेक लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये कार्तिक आर्यनची गणना होते. अभिनेता कार्तिक करायचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त कार्तिकने सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

हे ही वाचा –  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील मुनमुन दत्ताचा जर्मनीमध्ये झाला अपघात

- Advertisement -

वाढदिवसापूर्वी कार्तिक आर्यनने आयएफएफआय (IFFI) 2022 च्या उद्घाटनात आपल्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. आज सुपरस्टार कार्तिक आर्यन याने त्याच्या वाढदिवसा निमित्त सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. यावेळी कार्तिक आर्यन पांढऱ्या शुभ्र कुर्त्यामध्ये सिद्धिविनायक मंदिरात दिसला.

- Advertisement -

कार्तिक आर्यांचा हा वाढदिवस त्याच्यासाठी खूपच स्पेशल असणार आहे . ‘धमाका’नंतर, कार्तिक आर्यनचा आगामी ओटिटी (OTT) चित्रपट ‘फ्रेडी’ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. त्यानंतर, कार्तिक आर्यन क्रिती सॅननसोबत अ‍ॅक्शन-एंटरटेनर ‘शेहजादा’ मध्ये दिसणार असून, हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, ‘कॅप्टन इंडिया’, ‘सत्यप्रेम की कथा’ आणि ‘आशिकी 3’ या चित्रपटांचाही भाग आहे.

हे ही वाचा – कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा गेला होता आवाज; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -