Mother’s Day निमित्त करिनाने चाहत्यांने दाखवली तिच्या दुसऱ्या बाळाची झलक, पहा फोटो

मदर्स डेच्या निमित्ताने करिनाने तिच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली

On the occasion of Mother's Day,Bollywood Actress Kareena kapoor khan showed fans a glimpse of her second baby, see photo
Mother's Day निमित्त करिनाने चाहत्यांने दाखवली तिच्या दुसऱ्या बाळाची झलक, पहा फोटो

सोशल मीडियावर आज मातृदिनानिमित्त (Mother’s Day) अनेक जण आपल्या आईला शुभेच्छा देत आहेत. अनेक कलाकरांनी आपल्या आईसोबतचे सुंदर फोटो शेअर करुन आजचा दिवस सुंदर बनवला आहे. सर्वत्र मदर्स डे चा उत्साह आहे. परंतु चाहत्यांच्या लाडक्या बेबोने मदर्स डे निमित्त एक खास सरप्राईज चाहत्यांना दिले आहे. गेली अनेक तिचे चाहते या क्षणाची वाट पाहत होते. करिनाने तिच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या दुसऱ्या बाळाला पाहून नेटकऱ्यांनी फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. मदर्स डेच्या निमित्ताने करिनाने दिलेले हे सरप्राईज सर्वांनाच आवडलेले दिसत आहे. आता मोठा दादा झालेला तैमूर आपल्या हातात छोट्या तैमूरला घेऊन बसला आहे. सध्या या दोन छोट्या नवाबांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेली अनेक दिवस सर्वांनाच करिनाच्या दुसऱ्या बाळाला पाहण्याची इच्छा होती. मदर्स डेच्या निमित्ताने करिनाने तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. ‘आज संपूर्ण दुनिया आशेवर अवलंबून आहे. हे दोघे मला चांगल्या भविष्याची आशा देत आहेत. सर्व सुंदर आणि स्ट्रॉग मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा’,अशी पोस्ट लिहित आपल्या दोन्ही मुलांचे फोटो करिनाने पोस्ट शेअर केले आहेत. करिनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी करिनाला व तिच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘फोटोची झलक तर दाखवली आता बाळाचं नावही सांगा’, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

करिनाचा पहिला मुलागा तैमुर हा जन्मल्यापासून अनेक वेळा चर्चेचा विषय बनला आहे. पापाराझिंच्या कॅमेरापासून तैमूर नेहमीच आपली सुटका करु पाहत असतो. तैमुरची सोशल मीडियावरही खूप चर्चा सुरु असते. करिना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाला मात्र लाइमलाईट पासून दूर ठेवलेले पहायाला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी करिनाच्या वडिलांनी चुकून करिनाच्या दुसऱ्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो फोटो प्रचंड व्हायरल झाला होता


हेही वाचा – Mother’s Day: वयाच्या सतराव्या वर्षापासून ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री साकारतेय आईची भूमिका