टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री कृती सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशातच निर्माते चित्रपटाशी संबंधित नवनवीन अपडेट शेअर करत आहेत. आज सीता नवमीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी एक नवीन मोशन पोस्टर रिलीज केले आहे. यासोबतच चित्रपटाचा ऑडिओ टीझरही ‘राम सिया राम’ या गीतासह दाखवण्यात आला आहे.
ओम राऊत दिग्दर्शित ‘ आदिपुरुष ‘ या चित्रपटातील प्रभास आणि कृती सेननचे वेगवेगळे ऑडिओ आणि व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. दरम्यान, सीता नवमीच्या मुहूर्तावर प्रभास आणि कृती सेननसह ‘राम सिया राम’चा ऑडिओ टीझर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या ऑडिओ टीझरच्या रिलीजसोबतच त्याच्या कॅप्शनमध्ये देवी सीतेचे वर्णन करण्यात आले आहे.
सीतेच्या भूमिकेत कृती सेनन
सीता राम चरित अति पावन
The righteous saga of Siya Ram
Jai Siya Ram
जय सिया राम
జై సీతారాం
ஜெய் சீதா ராம்
ಜೈ ಸೀತಾ ರಾಮ್
ജയ് സീതാ റാം#Adipurush #SitaNavmi #Prabhas @omraut #SaifAliKhan pic.twitter.com/sk7LIGUjee— Kriti Sanon (@kritisanon) April 29, 2023
हा व्हिडिओ पोस्टर शेअर करताना कृती सेननने कॅप्शनमध्ये देवी सीतेच्या निस्वार्थीपणा आणि पवित्रतेचे वर्णन केले आहे. सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये कॅप्शनमध्ये ‘जय सिया राम’ लिहून तिने हा ऑडिओ टीझर शेअर केला आहे. यासोबतच देवी सीतेच्या भूमिकेत कृती सेननचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.
प्रभास आणि कृति सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसेल तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसेल. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ सारख्या चित्रपटानंतर प्रभासला या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा :