घरमनोरंजनVideo: लतादीदींच्या सल्ल्यानंतरही गायलं त्यांचं 'हे' गाजलेलं गाणं

Video: लतादीदींच्या सल्ल्यानंतरही गायलं त्यांचं ‘हे’ गाजलेलं गाणं

Subscribe

या व्हिडीओमधून आपल्या आवाजानं रानूने पुन्हा एकदा सर्वांची जिंकली मनं

रानू मंडलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी रानूने लतादीदींचे गाणं गायल्यानंतर लता दीदींनी रानूला सल्ला दिला होता. मात्र, लतादीदींनी दिलेल्या सल्ल्यानंतर देखील रानू मंडलने त्यांचच एक गाणं गायलं आहे. हे गाणं लता दीदींचं ‘प्यार करनेवाले कभी डरते नहीं’ असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणं रानूने ‘तेरी मेरी कहानी’च्या रिलीज सोहळ्याच्या वेळी गायल्याचे दिसत आहे. रानूच्या गाण्यावर काहींनी आक्षेप घेतला असला तरी या व्हिडीओमधून आपल्या आवाजानं रानूने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.

- Advertisement -

असा दिला होता लता दीदींनी रानूला सल्ला

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणाल्या, ‘मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं झालं तर मी स्वत:ला भाग्यवान समजते. मात्र मला खात्री आहे, माझी कॉपी करून, नक्कल करून फार काळ यश मिळत नाही. हल्ली नवीन येणारे गायक किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांची गाणी म्हणतात. त्यामुळे काही काळ ही गाणी म्हणणाऱ्या गायकांना प्रसिध्दी मिळते. पण ही प्रसिध्दी फार काळ टिकत नाही. सध्याच्या घडीला अनेक उदयोन्मुख गायिका येतात पण कोणीच लक्षात रहात नाहीत. “मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल ठाऊक आहेत” असंही त्या म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधूनन घेणारी रानू मंडल आता अधिकच प्रकाश झोतात येत चालली आहे. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानू मंडलच्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. यानंतर रानूला हिमेश रेशमियाने त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. हिमेशच्या स्टुडिओमधील रानूने ‘तेरी मेरी काहानी’ हे गाणं गायलं होतं, या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हिमेशने दिलेल्या संधी नंतर तिच्या पहिल्या गाण्याची तसेच आवाजाची उत्सुकता सर्वत्र होती. या गाण्यानंतर रानूचे ‘आदत’ हे नवं गाणं देखील चाहत्यांच्या भेटीला य़ेणार आहे.


हेही वाचा – रानू मंडल पुर्वी ‘ही’ होती स्टेशनवर गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -