घरमनोरंजनपुन्हा एकदा 'KBC'चे प्रश्न घेवून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला, 'कौन बनेगा करोडपती...

पुन्हा एकदा ‘KBC’चे प्रश्न घेवून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला, ‘कौन बनेगा करोडपती १३’ चा दमदार प्रोमो पाहा!

Subscribe

प्रोमो पाहता त्यात बिग बी अमिताभ बच्चन स्टेजवर एन्ट्री करताना दिसून येत आहेत.

कौन बनेगा करोडपतीच्या नव्या पर्वाची वाट पाहणाऱ्या मंडळींसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडचे बिग बी यांचा शो कौन बनेगा करोडपती १३ ची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. सोनी चॅनलने ट्विटवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, “पुन्हा एकदा केबीसीचे प्रश्न घेऊन भेटीला येत आहेत मिस्टर अमिताभ बच्चन… तर उचला फोन आणि व्हा तयार…. कारण १० मे पासून सुरु होत आहेत ‘केबीसी १३’ साठीचे रजिस्ट्रेशन ! ” असे कॅप्शन दिले आहे. या नव्या सीझनचा प्रोमोदेखील शेअर करण्यात आला आहे. प्रोमो पाहता त्यात बिग बी अमिताभ बच्चन स्टेजवर एन्ट्री करताना दिसून येत आहेत. केबीसीच्या या नव्या पर्वात १० मे पासून विचारले जाणारे प्रश्न किती वाजता टेलिकास्ट होणार आहेत आणि कशा पद्धतीने पोहचावी लागतील, याबाबतची माहिती देखील लवकरच देण्यात येणार आहे.

 मागील वर्षी हा कार्यक्रम २८ सप्टेंबरला प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे केबीसीच्या सेटवर अभिनेता बच्चन यांनी पीपीई कीट घालून आणि सर्व कोव्हिड नियमांचे पालन करुन शूटिंग करण्यात आली होती. यंदाही अशाच प्रकारचे शूटिंग करणार असल्याचे दिसत आहे. सोबतच या सीजनमध्ये बायो बबल लावून शूटिंग केली जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र या कार्यक्रमाची शूटिंग कुठे होणार याबाबत माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
मागील वर्षी या शोमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. स्पर्धकाचे ऑनलाईन ऑडिशन घेतले होते. तसेच ऑडियंस पोल लाईफलानचं व्हिडिओ – अ फ्रेंड लाइफलाइन मध्ये रुपांतरित करण्यात आले होत.

- Advertisement -

हे वाचा-  ड्रग्ज खरेदी केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुवला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -