पुण्यात बस चालकाने टिक-टॉक व्हिडीओमुळे गमावली नोकरी

पुण्यात एका पीएमपी बस चालकाला टिक-टॉकवर व्हिडीओ बनवणे चांगलच महागात पडल आहे. पुण्यातील या बस चलकाला आपल्या व्हिडीओ बनवण्याच्या छंदापायी नोकरी गमवण्याची वेळ आली आहे.

one bus driver has been suspended for tiktok video in pune
पुण्यात बस चालकाने टिक-टॉक व्हिडीओमुळे गमावली नोकरी

सध्या टिक-टॉकवर व्हिडीओ बनवण्याचा जोरदार ट्रेंड सुरू आहे. या माध्यमाचे मोठ्या संख्येंने युजर्स आहेत. यामध्ये फक्त तरूणचं नाही तर सर्वचं वयोगटातील व्यक्ती हल्ली मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे व्हिडीओ बनवून टिक-टॉकवर शेअर करत असतात. पर्यटन स्थळीच नाही तर घर, ऑफिस , महाविद्यालय सर्वच ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळतो. या व्हिडीओंमुळे अनेक जणांनी फार कमी कालावधीतच प्रसिद्धीदेखील मिळवली आहे. मात्र पुण्यात एका पीएमपी बस चालकाला टिक-टॉकवर व्हिडीओ बनवणे चांगलच महागात पडल आहे. पुण्यातील या बस चलकाला आपल्या व्हिडीओ बनवण्याच्या छंदापायी नोकरी गमवण्याची वेळ आली आहे.

बस चालकाला केले निलंबीत

या बस चालकाने कमावर असताना टिक-टॉकवर एक व्हिडीओ केला होता. यानंतर बस डेपोवर केलेला तो व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला..या व्हिडीओची प्रशासनाने दखल घेत बस चालकाला नोकरीवरून निलंबीत करून चौकशीचीही कारवाई केली. प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टीकोनातून हे चूकीचे आहे तसेच यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होऊ शकते असे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

प्रशासनाने चालक-वाहकांना बजावली नोटीस 

या प्रकरणी प्रशासनाने चालक-वाहक तसेच खासगी बसमधील सेवकांना व्हिडीओ व्हायरल न करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना देखील अश्याप्रकारचे कोणतेही व्हिडीओ न करण्यास प्रतिबंध करण्याची सूचना करण्यात आली असून एक परिपत्रकही काढण्यात आले आहे. यामध्ये व्हिडीओ, फोटोस व्हायरल झाल्याचे निर्देशनास आल्यास त्याची सर्व चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे असे नमूद करण्यात आलं आहे.