काय आहे ‘विल स्मिथ’ची बकेट लिस्ट

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने आपल्या इच्छांची बकेट लिस्ट नुकतीच जाहीर केली आहे. या बकेट लिस्टमध्ये बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा त्याने वर्तवली.

will smith
प्रातिनिधिक फोटो

जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ हा नेहेमीच विविध भूमिकेत दिसतो. अभिनेता असूनही स्मिथच्या काही इच्छा अद्यापही अपूर्ण राहिल्या आहेत. त्याने आपल्या इच्छांची बकेट लिस्ट बनवली आहे. त्याने नुकतीच आपली बकेट लिस्टमधील इच्छा एका कार्यक्रमादरम्यान सांगितली. या इच्छेनुसार विल ला बॉलिवूडमध्ये एकदा भांगडा डान्स करायची इच्छा आहे असे म्हटलं आहे. अकादमी पुरस्कार विजेता आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता विल स्थिथच्या इच्छा ऐकून यापुढे स्मिथ बॉलिवूडमध्येही दिसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. १६ व्या हिंदुस्थान टाइम्स लिडरशीप समिट मध्ये बॉलिवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तर याच्याशी बोलतांना स्थिथने आपली ही इच्छा सांगितली. मागील अनेक वर्षांपासून विल स्मिथ हॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. फरानने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान विलने ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाच्या गाण्यावर डान्स केला. Hitch, I am Legend, I, Robot, and Men in Black I, II, & III या चित्रपटांमध्ये स्मिथ मुख्य भूमिकेत दिसला होता.

काय आहे विलची इच्छा

बॉलिवूडमधील एका चित्रपटात मला डान्स करायला आवडेल. १५ वर्षा पूर्वी ज्यावेळी मी अभिनेत्री ऐश्वर्या राय ला भेटलो होते त्यावेळी ही इच्छा मी मांडली होती. मात्र मला कधीही संधी मिळाली नाही. भारत एक सुंदर देश आहे असे स्मिथ याने सांगितले.

काय म्हणाला स्मिथ

“वयाच्या १२ व्या वर्षापासूनच मला गाण्याची आवड होती. ७० च्या दक्षकात मी पॉप गाण्यांपासून आपल्या करियरची सुरुवात केली. पहिल्यांदा रॅप ऐकला तेव्हा मीसुद्धा त्यावेळी मला आवड निर्माण झाली. लहानपणापासून मला स्वःताला जगातील सर्वात मोठ स्टार बनायचे होते. अभिनेता होण्यापूर्वी मी चित्रपट बघत होतो तेव्हा मी ही एक दिवस मोठा कलाकार बनेल असे स्वन्प मी उराशी बाळगले होते.”- विल स्मिथ

‘कॉफी विथ करण’मध्येही विल

‘कॉफी विथ करण’मध्येही विल स्मिथ लकरच दिसणार आहे. करण जोहर ने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर विल स्मिथबरोबर काढलेला फोटो शेअर केला आहे. याफोटोत करण जोहर, रणवीर सिंग आणि विल स्मिथ एकत्र दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

Where there’s a WILL there’s a way!!!! @ranveersingh @willsmith shot today at the superb #sohohousemumbai

A post shared by Karan Johar (@karanjohar) on